भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीला (Bhojpuri Film Idnustry) मोठा धक्का बसला. अभिनेत्री अमृता पांडेने (Amrita Pandey)आत्महत्या केल्याची बातमी समोर आली असून यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. अमृताने घरामध्येच साडीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी अमृताने व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवला होता.
अमृताच्या घरातून पोलिसांनी काही वस्तू जप्त केल्या आहेत. अमृताने ज्या साडीने गळफास घेतला ती साडी, मोबाईल फोन आणि इतर काही वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अमृताचा मृतदेह बेडवर पडलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमृता पांडेचा 27 एप्रिल रोजी बिहारमधील भागलपूर जोगसर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील तिच्या अपार्टमेंटमध्ये संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ अमृताच्या घरी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. अमृताने आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. अमृताच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस सर्व बाजूने तपास करत आहेत.
अमृताने आत्महत्येपूर्वी व्हॉट्सॲपवर एक स्टेटस पोस्ट केले होते. त्यामुळेही अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. तिने स्टेटसमध्ये असे लिहिले होते की, 'त्यांचे आयुष्य दोन बोटींवर स्वार आहे. मी माझी बोट बुडवून त्याचा मार्ग सुकर केला.' अमृताच्या निधनानंतर तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
अमृताच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तिला तिच्या करिअरची चिंता होती आणि ती डिप्रेशनमध्येही होती. तिच्यावर उपचार सुरू होते. काम न मिळाल्याने अमृता नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. 2022 मध्ये तिचे लग्न बिलासपूर येथील चंद्रमणी झांगडशी झाले होते. तिचा नवरा ॲनिमेशन इंजिनीअर आहे.
अमृताच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ती उदास होती पण तिच्या नवीन वेब सीरिज 'प्रतिशोध'च्या रिलीजबद्दल ती खूप उत्साही होती. पण अचानक अमृताने टोकाचे पाऊल उचलत जीवन का संपावले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नुकतेच 18 एप्रिल रोजी अमृताच्या बहिणीचे लग्न झाले. तिच्या वैवाहिक जीवनात ती खूप आनंदी होती. तिला नैराश्यावर उपचाराचीही गरज होती. आता या प्रकरणाची प्रत्येक बाजूने पोलिस तपास करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.