Kajol Devgan : “…तुझी नाटकं बंद कर”; चाहत्यासोबत उद्धटपणे वागल्यामुळे काजोल झाली ट्रोल, पोस्ट व्हायरल

Kajol Devgan Trolled : अभिनेत्री काजोल देवगणच्या चाहत्याने तिच्यासोबतच्या भेटीबद्दलचा एक वाईट अनुभव पोस्टच्या माध्यमातून शेअर केलेला आहे.
Kajol Devgan Trolled
Kajol Devgan TrolledTwitter

Kajol Devgan Trolled

बॉलिवूडमध्ये ९०च्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री काजोल देवगणचं नाव आवर्जुन घेतलं जातं. तिने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये आपलं स्थान प्रस्थापित केले आहे. या एव्हरग्रीन अभिनेत्रीचे जगभरामध्ये चाहते आहेत. अशातच अभिनेत्रीच्या एका चाहत्याची रेडिट पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. त्यामध्ये अभिनेत्रीच्या चाहत्याने तिच्यासोबतच्या भेटीबद्दलचा एक वाईट अनुभव शेअर केलेला आहे. (Bollywood)

Kajol Devgan Trolled
Jui Gadkari Received Threat : '... नाही तर तुला जेलमध्ये टाकेन'; जुई गडकरीला तरूणीने का दिली धमकी ?

काजोलच्या चाहत्यानेही पोस्ट बॉली ब्लाईन्ड्स अ‍ॅण्ड गॉसिप (r/BollyBlindsNGossip) या रेडिट अकाउंटवरून शेअर केली आहे. अभिनेत्रीच्या चाहत्याच्या बहिणीने अशी तक्रार केली होती की, जुहूतल्या एका हाय प्रोफाईल रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या तिच्या ऑटिस्टिक भावाबरोबर काजोल अत्यंत उद्धट वागली होती. त्या घटनेसंबंधित काजोलच्या चाहत्याच्या बहिणीने घटनेसंबंधित सविस्तर पोस्ट लिहिलेली आहे. (Bollywood Actress)

या पोस्टमध्ये लिहिलंय की, "माझा भाऊ मुंबईतल्या जुहूमधील एका रेस्टॉरंटमध्ये नोकरी करतो. त्या रेस्टॉरंटमध्ये काल काजोल तिच्या फ्रेंड्ससोबत आला होती. काजोलला पाहून माझ्या भावाला प्रचंड आनंद झाला होता. त्याने तिला अगदी व्यवस्थित सर्व्हिसही दिली. तिचं जेवण झाल्यानंतर तो तिच्याकडे तिचं बिल घेऊन गेला. माझ्या भावाला तिला, तुझ्यामुळे आयुष्य खूप सुखकर झालं. असं त्याला सांगायचं होतं. त्यासोबतच त्याला तिला भविष्यासाठी शुभेच्छा द्यायच्या होत्या." (Social Media)

Kajol Devgan Trolled
Irrfan Khan Death Anniversary : इरफान खानचे 'हे' १० चित्रपट नक्की पाहा, असा अभिनय कधी बघितलाच नाही!

"खरंतर, तो तिचा खूप मोठा फॅन आहे. त्याला त्याची आवडती अभिनेत्री भेटल्यामुळे तो तिच्यासमोर आनंदाने रडु लागला होता. पण काजोल म्हणाली, 'झालं का? आता नाटक बंद करा आणि बिल द्या आम्हाला.' नंतर काजोलने भावाबद्दल मॅनेजरकडे तक्रारही केली. या घटनेमुळे भाऊ आता कोणासोबतही बोलताना खूप विचार करतो." काजोलचीही फॅनची जुनी पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. काजोलच्या ह्या वागणुकीमुळे तिला अनेक युजर्सने तिला ट्रोल केले आहे. (Entertainment News)

Kajol Devgan Trolled
Tamannaah Bhatia News : IPL मॅचचं बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरण, तमन्ना भाटियाने चौकशीसाठी मागितला वेळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com