Irrfan Khan Death Anniversary : इरफान खानचे 'हे' १० चित्रपट नक्की पाहा, असा अभिनय कधी बघितलाच नाही!

Irrfan Khan Death Anniversary : बॉलिवूड अभिनेता इरफान खानकडे अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना अभिनयामध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही अभिनयाची छाप उमटवली.
Irrfan Khan Death Anniversary : इरफान खानचे 'हे' १० चित्रपट आवश्य पाहा, आजही होतेय अभिनयाचे कौतुक
Irrfan Khan Death AnniversarySaam TV
Published On

Irrfan Khan 10 Best Films

बॉलिवूड अभिनेता इरफान खान आज जरीही आपल्यात नसला तरीही, तो आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या स्वप्नात कायम आहे. २९ एप्रिल २०२० रोजी इरफान खानचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं.

इरफान खानने आजच्या दिवशी मुंबईतल्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात वयाच्या ५३ व्या वर्षी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर फक्त बॉलिवूड मध्येच नाही तर, हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवली.

अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना इरफान खानने अभिनयामध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. जाणून घेऊया इरफान खानच्या सिनेकरियरमधील १० सर्वोत्कृष्ट चित्रपटांबद्दल...

Irrfan Khan Death Anniversary : इरफान खानचे 'हे' १० चित्रपट आवश्य पाहा, आजही होतेय अभिनयाचे कौतुक
Tamannaah Bhatia News : IPL मॅचचं बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरण, तमन्ना भाटियाने चौकशीसाठी मागितला वेळ

सलाम बॉम्बे (Salaam Bombay) 1988

मीरा नायर दिग्दर्शित 'सलाम बॉम्बे' चित्रपटातून इरफान खानने बॉलिवूड पदार्पण केले. या चित्रपटात इरफान खानने पत्र लेखकाची भूमिका साकारली होती. चित्रपटाला देशातच नव्हे तर परदेशातही अनेक पुरस्कार आणि प्रेम मिळाले.

हासिल (Haasil) 2003

तिग्मांशु धुलिया दिग्दर्शित 'हासिल' चित्रपटात महाविद्यालयीन राजकारण दाखवण्यात आले आहे. चित्रपटात इरफानने नकारात्मक भूमिका साकारली होती, पण त्याच्या भूमिकेने सर्वांचेच लक्ष वेधले.

मकबूल (Maqbool) 2004

विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'मकबूल' चित्रपट शेक्सपियरच्या 'मॅकबेथ' कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक मुंबई अंडरवर्ल्डवर आधारित आहे. चित्रपटात इरफानने मियाँ मकबूलची भूमिका साकारली.

द नेमसेक (The Namesake) 2006

मीरा नायरच्या 'द नेमसेक' चित्रपटाची कथा एका अमेरिकन मुलाची आहे. इरफान खान याचा हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला होता.

Irrfan Khan Death Anniversary : इरफान खानचे 'हे' १० चित्रपट आवश्य पाहा, आजही होतेय अभिनयाचे कौतुक
Mahadev Betting App Case : २००० सीम कार्ड, १७०० बँक खाते, ३२ आरोपी आणि १५००० कोटींचा स्कॅम; काय आहे महादेव बेटिंग अॅप घोटाळा?

बिल्लू (Billu) 2009

प्रियदर्शन दिग्दर्शित 'बिल्लू' चित्रपटामध्ये इरफान खानने एका न्हाव्याचे पात्र (केस कापणारा) साकारले आहे. इरफान खानसोबत शाहरुख खानही होता.

पान सिंग तोमर (Paan Singh Tomar) 2012

तिग्मांशु धुलिया दिग्दर्शित 'पान सिंग तोमर' चित्रपट इरफान खानच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. ही कथा एका भारतीय खेळाडू आणि ७ वेळा राष्ट्रीय स्टीपलचेस चॅम्पियन पान सिंग तोमरची आहे.

लंच बॉक्स (Lunch Box) 2013

रितेश बत्राच्या 'लंच बॉक्स' या चित्रपटामध्ये इरफान खानसोबत निम्रत कौरही मुख्य भूमिकेत होती. मुंबईचे डब्बेवालांवर आधारित चित्रपटाचे कथानक आहे.

Irrfan Khan Death Anniversary : इरफान खानचे 'हे' १० चित्रपट आवश्य पाहा, आजही होतेय अभिनयाचे कौतुक
Why Aamir Khan Called Mr. Perfectionist : आमिर खानला ‘बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट’चा टॅग कसा मिळाला?; शबाना आझमीचं नाव सांगत म्हणाला...

पीकू (Piku) 2015

शूजित सरकार दिग्दर्शित 'पीकू' चित्रपटामध्ये इरफानसोबत अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत आहे.

तलवार (Talvar) 2015

मेघना गुलजार दिग्दर्शित 'तलवार' चित्रपटात इरफान खानने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे कथानक २००८ नोएडा दुहेरी हत्याकांड (आरुषी तलवार हत्या प्रकरण) वर आधारित आहे.

हिंदी मीडियम (Hindi Medium) 2017

साकेत चौधरी दिग्दर्शित 'हिंदी मीडियम' चित्रपट एक सामाजिक संदेश देणारा आहे. चित्रपटाची कथा चांदणी चौकात राहणाऱ्या एका जोडप्याची आहे.

Irrfan Khan Death Anniversary : इरफान खानचे 'हे' १० चित्रपट आवश्य पाहा, आजही होतेय अभिनयाचे कौतुक
Why Aamir Khan Called Mr. Perfectionist : आमिर खानला ‘बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट’चा टॅग कसा मिळाला?; शबाना आझमीचं नाव सांगत म्हणाला...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com