Tamannaah Bhatia News : IPL मॅचचं बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरण, तमन्ना भाटियाने चौकशीसाठी मागितला वेळ

Tamannaah Bhatia News : अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला आज महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीसाठी बोलवले होते. परंतु अभिनेत्री मुंबईमध्ये नसल्यामुळे, तिने चौकशीसाठी वेळ मागितली आहे.
Bollywood News IPL Match Illegal Streaming Case Maharashtra Cyber Cell Actress Tamannaah Bhatia Seeks Time For Inquiry
Bollywood News IPL Match Illegal Streaming Case Maharashtra Cyber Cell Actress Tamannaah Bhatia Seeks Time For InquiryInstagram

Tamannaah Bhatia Seeks Time For Inquiry

टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला आज महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीसाठी बोलवले होते. परंतु अभिनेत्री मुंबईमध्ये नसल्यामुळे, तिने चौकशीसाठी वेळ मागितली आहे. तमन्नाने २०२३ मध्ये आयपीएलचा सामना फेअरप्ले अ‍ॅपवर (Fair Play App) लाईव्ह स्ट्रीम केला होते. यामुळे व्हायकॉम कंपनीला कोट्यवधींचं नुकसान झाले होते. त्यामुळे अभिनेत्रीला आज महाराष्ट्र सायबर सेलने चौकशी करीता बोलवले होते.

Bollywood News IPL Match Illegal Streaming Case Maharashtra Cyber Cell Actress Tamannaah Bhatia Seeks Time For Inquiry
Mahadev Betting App Case : २००० सीम कार्ड, १७०० बँक खाते, ३२ आरोपी आणि १५००० कोटींचा स्कॅम; काय आहे महादेव बेटिंग अॅप घोटाळा?

आयपीएल २०२३चे अभिनेत्रीने अनधिकृतरित्या स्क्रीनिंग केले होते. त्यामुळे वायकॉमला तब्बल १०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप वायकॉमने केला होता. या प्रकरणी २३ एप्रिलला बॉलिवूड अभिनेता संजय दत्तलाही महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र संजय दत्त चौकशीसाठी हजर झाला नव्हता. संजय दत्तने सायबर सेलला दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता काही नियोजित कामांमुळे तो मुंबईमध्ये नाही. म्हणून अभिनेत्याने चौकशीसाठी वेळ मागितला आहे. आता संजय दत्त पाठोपाठ तमन्ना भाटियाही मुंबईमध्ये नसल्यामुळे तिने महाराष्ट्र सायबरकडून वेळ मागितला आहे.

महाराष्ट्र सायबर सेलने व्हायकॉमच्या तक्रारीवरून फेअरप्ले अ‍ॅपविरोधात एफआयआर नोंदवला होता. प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तमन्नाला आज मुंबईमध्ये चौकशीकरीता बोलवले होते. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने तमन्ना भाटियासह आतापर्यंत अभिनेता संजय दत्त, रॅपर बादशाह आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांना चौकशीसाठी बोलवले होते. यापैकी काहींची चौकशी झालेली नाही.अभिनेता संजय दत्त, रॅपर बादशाह, अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांनी ॲपचे प्रमोशन केले होते. म्हणून त्यांना चौकशीसाठी बोलवले होते. (Entertainment News)

Bollywood News IPL Match Illegal Streaming Case Maharashtra Cyber Cell Actress Tamannaah Bhatia Seeks Time For Inquiry
Why Aamir Khan Called Mr. Perfectionist : आमिर खानला ‘बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट’चा टॅग कसा मिळाला?; शबाना आझमीचं नाव सांगत म्हणाला...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com