Mahadev Betting App Case : २००० सीम कार्ड, १७०० बँक खाते, ३२ आरोपी आणि १५००० कोटींचा स्कॅम; काय आहे महादेव बेटिंग अॅप घोटाळा?

Mahadev Betting App Case update : साहिल खानला छत्तीसगडमधून ताब्यात घेतलं. या घोटाळा प्रकरणी एसआयटीने साहिल खानची चौकशी केली होती. या प्रकरणात आतापर्यंत काय-काय झालं? जाणून घेऊयात.
Mahadev Betting App Case
Mahadev Betting App Case Saam tv

मुंबई : महादेव बेटिंग अॅप घोटाळा प्रकरणी अभिनेता साहिल खानला रविवारी अटक करण्यात आली आहे. यानंतर साहिल खानला एक मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला छत्तीसगडमधून ताब्यात घेतलं. या घोटाळा प्रकरणी एसआयटीने साहिल खानची चौकशी केली होती. या प्रकरणात आतापर्यंत काय-काय झालं? जाणून घेऊयात.

मुंबई सायबर सेलने म्हटलं की, साहिल खान चौकसीत सहकार्य करत नाहीये. त्यामुळे रिमांड घेऊन चौकशीची गरज आहे'. या प्रकरणी पोलिसांनी २००० हून अधिक सिम कार्ड जप्त केले आहेत. या घोटाळ्यासंबंधित १७०० बँक खात्याची माहिती मिळाली आहेत.

Mahadev Betting App Case
Ulhasnagar Crime News : 2 वर्षांपासून पोलिसांना देत होता चकवा; अखेर गुंड हितेंद्र ठाकूरला गुजरातमध्ये अटक

मुंबई पोलिसांनी ६ जानेवारीला दीक्षित कोठारी नावाच्या आरोपीला बेटिंग अॅप प्रकरणात अटक केली होती. साहिल खान या प्रकरणातील दुसरा आरोपी आहे. या प्रकरणासाठी एसआयटीचा स्थापना करण्यात आली आहे. एसआयटी चौकशीनंतर महादेव बेटिंग अॅप आणि रिअल एस्टेट कंपनीमधील आर्थिक व्यवहार ट्रांजेक्शनची माहिती समोर येणार आहे.

एसआयटीमुळे फायनान्स, रिअल एस्टेट कंपनी आणि महादेव सट्टेबाजी अॅपच्या प्रमोटरमधील व्यवहाराची माहिती समोर येणार आहे. मागील वर्षी कोर्टाच्या आदेशानंतर माटुंगा पोलिसांनी सट्टेबाजी अॅपवरून एफआयआर नोंदविण्यात आला होता. एफआयआरनुसार, हा १५००० कोटींचा घोटाळा आहे. या प्रकरणात महादेव बेटिंग अॅप प्रकरणात साहिल खान आणि ३१ व्यक्तींच्या विरोधात चौकशी सुरु आहे.

ईडी आणि मुंबई पोलिसांकडून तपास सुरु

पोलिसांच्या माहितीनुसार, तपासात आरोपींकडून बँक खाते, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर उपकरणाविषयी माहिती घेतली जात आहे. ईडीकडून महादेव बेटिंग अॅप प्रकरणात मनी लाँड्रिग अॅगलने तपास सुरु आहे.पोलिसांनी आतापर्यंत ३२ लोकांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे.

Mahadev Betting App Case
Crime News: प्रेमाचा भयानक शेवट! लग्नासाठी प्रेयसीचा दबाव, संतापलेल्या टॅक्सी ड्रायव्हरकडून भयानक कृत्य

केंद्राकडून महादेव बेटिंग अॅप बॅन

केंद्र सरकारने ५ नोव्हेंबर २०२३ रोजी महादेव बेटिंग अॅफ सहित इतर अवैध २२ अॅप आणि वेबसाईटला ब्लॉक करण्याचा आदेश दिला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com