Ulhasnagar Crime News : 2 वर्षांपासून पोलिसांना देत होता चकवा; अखेर गुंड हितेंद्र ठाकूरला गुजरातमध्ये अटक

गुंड हितेंद्र ठाकूर याने संदीप गायकवाड याचा मुलगा प्रथम याच्यावर ९ डिसेंबर २०२२ साली सी. ब्लॉक येथे जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर हितेंद्र ठाकूर पळून गेला होता.
police arrests local goonda hitendra thakur ulhasnagar
police arrests local goonda hitendra thakur ulhasnagar Saam Tv

Ulhasnagar :

उल्हासनगर शहरातील एका मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुंडाला तब्बल दोन वर्षांनी पोलिसांनी गुजरात मधून अटक केली आहे. उल्हासनगर न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Maharashtra News)

सन २०२० मध्ये हितेंद्र ठाकूरने श्रीराम चौकातील डान्सबार समोर संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी हितेंद्र ठाकूर अटक केली होती. जेलमधून बाहेर आल्यावर गुंड हितेंद्र ठाकूर याने संदीप गायकवाड याचा मुलगा प्रथम याच्यावर ९ डिसेंबर २०२२ साली सी. ब्लॉक येथे जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर हितेंद्र ठाकूर पळून गेला होता.

police arrests local goonda hitendra thakur ulhasnagar
Kalyan Murbad Railway Line: कल्याण मुरबाड रेल्वेच्या भूसंपादनाला शेतक-यांचा विरोध, पाेलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदाेलन शमले

ठाकूर हा गुजरात वापी येथील कांचननगर येथे असल्याचे निष्पन्न झाल्यावर मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या गुन्हे विभागाच्या पथकाने वापी मध्ये सापळा रचून हितेंद्र ठाकूर याला अटक केली.

उल्हासनगर न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावी आहे. हितेंद्र हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नारपोली पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी व चोरीचे एकुण ५ गुन्हे व पडघा पोलिस स्टेशन मध्ये घरफोडीचे २ गुन्हे दाखल असल्याची माहिती शंकर आवताडे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक) यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

police arrests local goonda hitendra thakur ulhasnagar
छत्रपतींच्या गादीचा मान ठेवा म्हणता अन् साताऱ्यातून उमेदवार देता; नितेश राणे कुणावर संतापले?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com