छत्रपतींच्या गादीचा मान ठेवा म्हणता अन् साताऱ्यातून उमेदवार देता; नितेश राणे कुणावर संतापले?

जय भवानी या शब्दावर निवडणूक आयोगासोबत लढत आहात. जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा देता मग त्यांच्या वंशजाबाबत विरोध का? असा सवाल नितेश राणेंनी संजय राऊत यांना केला.
nitesh rane questions sanjay raut on opposition to chhatrapati descendant candidate in satara lok sabha election
nitesh rane questions sanjay raut on opposition to chhatrapati descendant candidate in satara lok sabha electionsaam tv

- विनायक वंजारे

Nitesh Rane Vs Sanjay Raut :

कोल्हापूरच्या गादीचा अपमान करू नये असं म्हणणाऱ्या खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी खासदार उदयनराजे भाेसले (mp udayanraje bhosale) यांच्या बाबत हीच भूमिका का घेतली नाही? शिवरायांच्या वंशजांच्या विरोधात उमेदवार का उभा केला? स्वतःच ठेवावं झाकून दुसऱ्याच बघावं वाकून ही वाईट सवय संजय राऊत यांनी सोडून द्यावी. तुम्ही साताऱ्याची (satara lok sabha election) जागा सोडा मग आम्ही विचार करू असे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी आज सिंधुदूर्ग येथे माध्यमांशी बाेलताना नमूद केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बाेलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोल्हापूर मध्ये सभा घेणार आहेत. माेदी हे शाहू छत्रपती यांच्या विराेधात प्रचारासाठी येत आहेत. माेदी महाराष्ट्रात शाहू छत्रपतींच्या विराेधात प्रचारासाठी आले हाेते हे महाराष्ट्र कधीच विसरणार नाही असेही राऊत यांनी नमूद केले.

nitesh rane questions sanjay raut on opposition to chhatrapati descendant candidate in satara lok sabha election
Sangli Constituency : संजयकाका पाटील भाजप बंडखोर माजी नगरसेवकांचे आव्हान स्वीकारणार?

राऊत यांच्या भूमिकेवर बाेलताना नितेश राणे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांचे वशंज उदयनराजे भाेसले यांच्या विराेधात राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार दिला आहे हे देखील महाराष्ट्र पाहत आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी गेली अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊनच राजकारण केले आणि आजही करताहेत.

साता-याच्या गादीचा मान का ठेवला जात नाही? गादी समोर कोणी मोठं नाही. जेवढी कोल्हापूरची गादी महत्वाची आहे. तेवढीच साताऱ्याची ही गादी महत्वाची असे राणेंनी स्पष्ट केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

nitesh rane questions sanjay raut on opposition to chhatrapati descendant candidate in satara lok sabha election
Vinayak Raut Vs Narayan Rane: पक्षप्रमुखांचा रस्ता रोखणारे अजून जन्माला आलेला नाही; विनायक राऊत नारायण राणेंवर बरसले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com