Vinayak Raut Vs Narayan Rane: पक्षप्रमुखांचा रस्ता रोखणारे अजून जन्माला आलेला नाही; विनायक राऊत नारायण राणेंवर बरसले

ratnagiri sindhudurg lok sabha constituency: देशात आणि महाराष्ट्रात उद्योग आणायचे काम ते करतात या राणेंच्या विधानामुळे उद्योग मंत्री उदय सामंत काहीच काम करत नाहीत का विनायक राऊत यांनी राणेंना खोचक टोला लगावला.
vinayak raut challenges narayan rane on criticising uddhav thackeray ratnagiri sindhudurg constituency
vinayak raut challenges narayan rane on criticising uddhav thackeray ratnagiri sindhudurg constituency Saam Digital

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election :

मोदींच्या मंत्रीमंडळात मंत्री होऊन सुद्धा राणेंमध्ये चेंबूरच्या नाक्यावरचा नाऱ्या आजही जिवंत आहे. तीच दहशत, दादागिरीची भाषा ते या कोकण भूमीत करताहेत मात्र कोकणवासीय त्यांना रस्ता दाखवतील असे प्रत्युत्तर खासदार विनायक राऊत (mp vinayak raut) यांनी मंत्री नारायण राणे (mp narayan rane) यांच्या आव्हानाला दिले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रत्नागिरी सिंधुदूर्ग लाेकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा, सभा हाेणार आहे. या मेळाव्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याबाबत नारायण राणेंनी टीका केली. उध्दव ठाकरे यांनी सिंधुदुर्गात येऊन शेलक्या भाषेत टीका केल्यास त्यांना परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी दाखवतो अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला.

vinayak raut challenges narayan rane on criticising uddhav thackeray ratnagiri sindhudurg constituency
Udayanraje Bhosale On Congress: नेत्यांची लाेकप्रियता वाढल्यास काँग्रेस त्यांना गायब करतं; विविध दाखले देत उदयनराजेंचा गंभीर आरोप, Video

राणेंच्या या विधानाचा खासदार विनायक राऊत यांनी समाचार घेतला. राणेंच्या या इशाराला आम्ही कचऱ्याची टोपली दाखवतो असं सांगत आमच्या पक्ष प्रमुखांचा रस्ता अडवणारी औलाद अजून जन्माला आलेली नाही आणि आलीच तर त्यांना कुठली जागा दाखवायची याची ताकद आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे असा गर्भित इशारा विनायक राऊत यांनी नारायण राणेंना दिला. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

राजकीय वैर तरी सामंत कुटुंबाकडे आम्ही आदरांने पहातो

उदय सामंत हे राजकीय वैरी असले तरी आम्ही कधीही सामंत कुटुंबियांचा अवमान केलेला नाही असे रत्नागिरीत एका प्रचार सभेत खासदार विनायक राऊत यांनी नमूद केले. ते म्हणाले रत्नागिरीचा विकास करणार असं राणे सांगताहेत. देशात आणि महाराष्ट्रात उद्योग आणायचे काम ते करतात या राणेंच्या विधानामुळे उद्योग मंत्री उदय सामंत काहीच काम करत नाहीत का विनायक राऊत यांनी राणेंना खोचक टोला लगावला.

Edited By : Siddharth Latkar

vinayak raut challenges narayan rane on criticising uddhav thackeray ratnagiri sindhudurg constituency
सुषमा अंधारेंमुळे मनिषा कायंदेंपासून नीलम गोऱ्हेंपर्यंत सर्वांनी पक्ष सोडला : रुपाली चाकणकर, Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com