Juna Furniture Collection : महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर'ची बॉक्स ऑफिसवर कमाल, पहिल्या विकेंडला कमावले कोट्यवधी रुपये

Juna Furniture Box Office Collection : महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.
Juna Furniture Box Office Collection
Juna Furniture Box Office CollectionSaam Tv News

Juna Furniture Box Office Collection

महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. आई- वडील आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणाऱ्या ह्या चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा होत आहे. ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या चार दिवसांत जोरदार कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत कोट्यवधींची कमाई केलेली आहे.

Juna Furniture Box Office Collection
Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टनुसार, चित्रपटाने एकूण चार दिवसांत २. ५९ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ४० लाख, दुसऱ्या दिवशी ७७ लाख, तिसऱ्या दिवशी १.९ कोटी तर चौथ्या दिवशी ३३ लाखांची कमाई केलेली आहे. चित्रपटामध्ये थिएटरमध्ये २६ एप्रिलला रिलीज झालेला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरीही करत आहे. (Marathi Film)

ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा 'जुनं फर्निचर… या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा!' चित्रपट वेगळ्या कथेमुळे प्रदर्शनाच्या आधीपासूनच चर्चेत आहे. चित्रपटाचे कथानक वृद्धापकाळात आपली मुले आपल्याला कशा प्रकारे नाकारतात आणि त्याकाळात शरीर काम करत नसल्यामुळे पैसे नसल्यामुळे होणारे हाल या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना भावले असून चित्रपटाचे कौतुक होत आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत, मेधा मांजरेकर, महेश मांजरेकर, अनुषा दांडेकर, भूषण प्रधान, शरद पोंक्षे, विजय निकम, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, संतोष मिजगर, अलका परब अशी तगडी स्टारकास्ट आहे. (Entertainment News)

Juna Furniture Box Office Collection
Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com