Bigg Boss Marathi : महेश मांजरेकर लवकरच सांगणार 'राग शांत करण्याचे १०१ उपाय'

महेश मांजरेकरांनी बिग बॉस ४ पर्वाचा प्रोमो व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Bigg Boss Marathi will start soon
Bigg Boss Marathi will start soonSaam Tv

मुंबई : हिंदीप्रमाणे मराठीमध्येही बिग बॉस(Bigg Boss) हा कार्यक्रम चांगलाच चर्चेचा विषय ठरलेला आहे. मराठीमध्ये बिगबॉसचे आतापर्यंत एकूण ३ सीझन झाले आहेत. आता लवकरच येत्या काही दिवसांमध्ये बिगबॉसचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच, बिग बॉसचे होस्टिंग महेश मांजरेकर करणार या वृत्ताला चांगलेच तुफान आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमाची सुत्रसंचालनाची जबाबदारी महेश मांजरेकर यांच्याच खांद्यावर आहे. महेश मांजरेकरांनी(Mahesh Manjrekar) बिग बॉस ४ पर्वाचा प्रोमो व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Bigg Boss Marathi will start soon
Yashoda Teaser : समंथा दिसणार प्रेग्नंट लेडीच्या भूमिकेत; अ‍ॅक्शन, थ्रिलर, सस्पेंसने भरलेला 'यशोदा'चा टीझर लॉन्च

महेश मांजरेकरांनी शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, 'मी करणार आहे बिगबॉस मराठीची सगळ्यात मोठी घोषणा', असे म्हणत हा प्रोमो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये महेश मांजरेकरांचे तीन लूक दिसत आहेत. पहिल्या लूकमध्ये त्यांनी जॅकेट आणि सदरा परिधान केला आहे तर दुसऱ्या लूकमध्ये तोंडात शिट्टी आणि सोबतच एक डॅशिंग लूक दिसत आहे. तर तिसऱ्या लूकमध्ये मांजरेकर पोस्टमनच्या वेशात दिसत आहेत. या प्रोमोनंतर चाहत्यांपासून ते कलाकारांनपर्यंत बिगबॉसच्या चौथ्या सीझनबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi will start soon
Thank God Movie: कॉमेडीच्या तडक्यासह माणुसकीची शिकवण; अजय देवगणचा 'थॅंक गॉड' २५ ऑक्टोबरला होणार रिलीज

महेश मांजरेकर आता कोणती आगामी घोषणा करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन पुढे ढकलल्याची बातमी गेल्या काही दिवसांमध्ये समोर येत होती. त्यामुळे आता निर्माते कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. माहितीनुसार महेश मांजरेकर लवकरच बिग बॉस मराठीची रिलीज डेट जाहीर करणार असेही म्हटले जात आहे.

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन कोण होस्ट करणार यावर वेगवेगळे अंदाज बांधले जात होते. बिग बॉस मराठीचे तिन्ही पर्व महेश मांजरेकरांनी होस्ट केले आहेत. गेल्यावर्षी कर्करोगामुळे महेश मांजरेकरांना काही भागांमधून ब्रेक घ्यावा लागला होता. त्यामुळे चौथा सीझन कोण होस्ट करणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. पण कलर्स मराठीने प्रोमो शेअर करत महेश मांजरेकर होस्ट करणार असल्याचे जाहीर केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com