ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट (Movie) आणि वेबसीरिज (Web Series) पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल प्रचंड वाढला आहे. प्रेक्षक देखील नवनवीन चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. ओटोटी प्लॅटफॉर्मवरील या चित्रपट आणि वेबसीरिजला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. प्रेक्षकांकडून मिळणारा उदंड प्रतिसाद लक्षात घेता ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणखी नवीन चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होत आहेत. अशामध्ये काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सने आपल्या नव्या चित्रपटांची, वेब सीरिजची घोषणा केली होती. त्यानंतर आता अॅमेझॉन प्राईमने(Amazon Prime Video) देखील आपल्या आगामी चित्रपट आणि वेबसीरिजची घोषणा केली आहे.
अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने आपल्या चाहत्यांना चांगलेच खूश केले आहे. १९ मार्चला या ओटीटी प्लॅटफॉर्मने आगामी वेबसीरिज आणि चित्रपटांची घोषणा केली आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने २०-२५ नाही तर तब्बल ७० वेब सीरिज आणि चित्रपटांची घोषणा केली आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने #AreYouReady या इव्हेंटचे मुंबईमध्ये आयोजन केले होते. या इव्हेंटमध्ये त्यांनी नव्या वेबसीरिज आणि चित्रपटांची घोषणा केली. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मिर्झापूर ३, पंचायत ३, फॅमिली मॅन ३, पाताल लोक २ या मोस्ट अवेटेड वेब सीरिजची घोषणा करण्यात आली. यासोबत मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या 'मटका किंग' या वेब सीरिजची देखील घोषणा करण्यात आली आहे. नागराज मंजुळे या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. तर, वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभूच्या 'सिटाडेल: हनी बनी', उर्फी जावेदच्या 'फॉलो कर लो यार', भूमी पेडणेकरच्या 'दलदल', अनन्या पांडेच्या 'कॉल मी बे' या चित्रपटांचा देखील समावेश आहे.
- सिटाडेल: हनी बनी (हिंदी)
- गुलकंद टेल्स (हिंदी)
- मटका किंग (हिंदी)
- दुपहिया (हिंदी)
- इंस्पेक्टर ऋषी (हिंदी)
- रंगीन (हिंदी)
- द ग्रेट इंडियन कोड (हिंदी)
- खौफ (हिंदी)
- द रेवोल्युशनरिज (हिंदी)
- दलदल (हिंदी)
- अंधेरा (हिंदी)
- इन ट्रांजिट (हिंदी)
- डेयरिंग पार्टनर्स (हिंदी)
- कॉल मी बे (हिंदी)
- द ट्राइब (हिंदी)
- फॉलो करलो यार (हिंदी)
- दिल दोस्ती डिलेमा (हिंदी)
- बँडवाले (हिंदी)
- जिद्दी गर्ल्स (हिंदी)
- वाक गर्ल्स (हिंदी)त सीझन 3 (हिंदी)
- मिर्झापूर सीझन 3 (हिंदी)
- स्नेक्स अॅण्ड लॅडर (तमिळ)
- द राणा कनेक्शन (तेलुगू)
- गँग्स कुरुथी पुनाल (तमिळ)
- अरबिया कदाली (तेलुगू)
- चीकाती लो (तेलुगू)
- उप्पू कप्पू रंबू (तेलुगू)
- कंतारा - ए लिजेंड चॅप्टर 1 (कन्नड)
- हरि हर वीरा मल्लू (तेलुगू)
- कंगुवा (तमिळ)
- वा वाथियार (तमिळ)
- उस्ताद भगत सिंह (तेलुगू)
- थम्मुडु (तेलुगू)
- गेम चेंजर (तेलुगू)
- फॅमिली स्टार (तेलुगू)
- ओम भीम बुश (तेलुगू)
- घाटी (तेलुगू)
- सुझल - द वोर्टेक्स सीझन 2 (तमिळ)
- थलाइवट्टियां पलायम (पंचायत तमिळ)
- शिवरापल्ली (पंचायत तेलुगू)
- माँ कसुम (हिंदी)
- ऐ वतन मेरे वतन (हिंदी)
- सुपरमॅन ऑफ मालेगांव (हिंदी)
- बी हॅप्पी (हिंदी)
- द मेहता बॉईज (हिंदी)
- छोरी 2 (हिंदी)
- सूबेदार (हिंदी)
- चंदू चॅम्पियन (हिंदी)
- सनकी (हिंदी)
- हाउसफुल 5 (हिंदी)
- बागी 4 (हिंदी)
- शूजीत सरकार का नेक्स्ट प्रोजेक्ट (हिंदी)
- स्त्री 2 (हिंदी)
- इक्कीस (हिंदी)
- तेरी बातों में ऐसा उलझा जिया (हिंदी)
- अश्वत्थामा - द सागा कॉन्टिन्यूज (हिंदी)
- सिंघम अगेन (हिंदी)
- वीमेन ऑफ माय बिलियन (हिंदी)
- योद्धा (हिंदी)
- बॅडन्यूज (हिंदी)
- युधरा (हिंदी)
- ग्राउंड ज़ीरो (हिंदी)
- अग्नि (हिंदी)
- मडगांव एक्स्प्रेस (हिंदी)
- डॉन 3 (हिंदी)
- पाताल लोक सीझन 2 (हिंदी)
- बंदिश बँडिट्स सीझन 2 (हिंदी)
- पंचायत सीझन 3 (हिंदी)
- मिर्झापूर सीझन 3 (हिंदी)
- स्नेक्स अॅण्ड लॅडर (तमिळ)
- द राणा कनेक्शन (तेलुगू)
- गँग्स कुरुथी पुनाल (तमिळ)
- अरबिया कदाली (तेलुगू)
- चीकाती लो (तेलुगू)
- उप्पू कप्पू रंबू (तेलुगू)
- कंतारा - ए लिजेंड चॅप्टर 1 (कन्नड)
- हरि हर वीरा मल्लू (तेलुगू)
- कंगुवा (तमिळ)
- वा वाथियार (तमिळ)
- उस्ताद भगत सिंह (तेलुगू)
- थम्मुडु (तेलुगू)
- गेम चेंजर (तेलुगू)
- फॅमिली स्टार (तेलुगू)
- ओम भीम बुश (तेलुगू)
- घाटी (तेलुगू)
- सुझल - द वोर्टेक्स सीझन 2 (तमिळ)
- थलाइवट्टियां पलायम (पंचायत तमिळ)
- शिवरापल्ली (पंचायत तेलुगू)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.