बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aaryan Khan) याला ड्रग्ज प्रकरणात अटक करून प्रसिद्धीच्या झोतात आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) पुन्हा चर्चेत आले आहे. समीर वानखेडे यांनी आता बॉविवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंतसाठी अडचणी निर्माण केल्या आहेत.
समीर वानखेडे यांनी राखी सावंत आणि वकील अली काशिफ खान यांच्याविरोधात 11 लाख रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. समीरने आपल्या याचिकेत राखी आणि काशिफवर आपली बदनामी आणि सन्मान दुखावल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप करत समीर वानखेडे यांनी दिंडोशी शहर दिवाणी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.
समीर वानखेडे यांनी आपल्या याचिकेमध्ये अशी मागणी केली आहे की, राखी सावंत आणि अली काशिफ खान यांना निर्देश दिले जावेत की भविष्यात ते समीर वानखेडे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये. समीर वानखेडे यांनी आपल्या पोस्टमधील कमेंट्स ऑफ केल्या आहेत. ज्यामुळे फॉलोअर्स त्यांच्या प्रतिक्रिया शेअर करू शकत नाहीत.
समीनच्या खटल्याला उत्तर देताना वकील काशिफ म्हणाले, 'जेव्हा लोकहितासाठी सत्य बोलले जाते तेव्हा बदनामी होत नाही, असे कायद्यात म्हटले आहे. IPC च्या कलम 499 मधील दुसरा अपवाद 'लोकसेवकांच्या सार्वजनिक वर्तन' बद्दल बोलतो. सार्वजनिक कार्ये पार पाडताना सार्वजनिक कर्मचाऱ्याच्या वागणुकीचा किंवा त्याच्या चारित्र्याचा आदर करून सद्भावनेने कोणतेही मत व्यक्त करणे ही बदनामी होत नाही.'
काशिफ यांनी पुढे सांगितले की, 'आता हे प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट असल्याने आम्ही त्यावर योग्य उत्तर देऊ. जर त्याने आपले म्हणणे बरोबर सिद्ध केले तर मी त्याला 11.01 लाख रुपये देईन.' या प्रकरणी राखी सावंतच्या बाजूने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया किंवा व्हिडिओ समोर आलेला नाही. तरी देखील राखीच्या अनेक जुन्या वक्तव्यांमध्ये तिने आर्यन खानला निर्दोष असल्याचे म्हणत पाठिंबा दिला आहे.
राखीने तिच्या एका व्हिडिओमध्ये म्हटले होते की, 'मी खूप दुःखी आहे, आपण सर्व मिळून प्रार्थना करूया की आर्यनला लवकरात लवकर जामीन मिळावा. खरे काय, खोटे काय ते कळत नाही. कोण कोणाला फसवतंय, मला एकच सांगायचं आहे की तुम्ही लोक सिंह असाल तर सिंहाशी लढा. कोल्हे असल्याचे भासवू नका आणि मुलाची शिकार करू नका.' आर्यन खानच्या अटकेनंतर राखी सावंतसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटींनी देखील आर्यन खानला पाठिंबा दिला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.