Samay Shah Interview : 'ते डिप्रेशनमध्ये नव्हते, त्यांना...'; गुरुचरण सिंह बेपत्ता झाल्यानंतर ऑनस्क्रिन मुलाचा मोठा खुलासा

Gurucharan Singh Missing Case : गुरूचरणचा ऑन स्क्रिन मुलाचं पात्र साकारणाऱ्या ज्युनियर सोढीने अर्थात समय शाहने एक महत्वाचा खुलासा केलेला आहे.
Samay Shah Reveals Gurucharan Singh Was Happy
Samay Shah Reveals Gurucharan Singh Was HappyInstagram

Samay Shah Reveals Gurucharan Singh Was Happy

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेमध्ये रोशनसिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग गेल्या एक आठवड्यापासून  बेपत्ता झाला आहे. गुरुचरण बेपत्ता झाल्यापासून त्याच्याबद्दल अनेक प्रकारच्या अफवा पसरत आहेत.

नुकतंच गुरूचरणचा ऑन स्क्रिन मुलाचं पात्र साकारणाऱ्या ज्युनियर सोढीने अर्थात समय शाहने एक महत्वाचा खुलासा केलेला आहे. त्याने सांगितले की काही महिन्यांपूर्वी मी गुरुचरणसोबत काही वेळ संवाद साधला होता आणि त्यांनी मला कामाबद्दल खूप मोटिव्हेट केले होते. अभिनेता त्याच्या पंजाबी चित्रपटावर काम करत असल्याचंही समयने सांगितलं. (Televesion Actor)

Samay Shah Reveals Gurucharan Singh Was Happy
Shivali Parab New Home : ‘हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने खरेदी केलं नवं घर, वाढदिवशीच करणार गृहप्रवेश

समय शाहने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, "मी ४ ते ५ महिन्यांपूर्वी गुरुचरण सिंह यांच्यासोबत बोललो होतो. जवळपास आम्ही एक तास एकमेकांसोबत बोललो, त्यांनी मला खूप मोटिव्हेट केले होते. आम्ही दोघेही एकमेकांसोबत आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्याबद्दल बोलत होतो. आम्ही मध्यंतरी एकत्र काम करत नव्हतो, त्यावेळी मी त्यांना खूप मिस करत होतो. मी त्यांच्या आठवणींना उजाळा देत होतो." (Televesion Actor)

मुलाखतीमध्ये, समयने गुरूचरण सिंगच्या डिप्रेशनवरही भाष्य केले आहे. तो म्हणाला, "जेव्हा आम्ही एकमेकांसोबत बोललो त्यावेळी गुरूचरण आनंदित होते. अनेक लोकं म्हणत आहेत की, गुरूचरण डिप्रेशनमध्ये होता, पण मला यावर विश्वास बसत नाही. मानवी भावना केव्हा कशी बदलेल आपण सांगू शकत नाही. आम्ही जेव्हा एकमेकांसोबत बोलायचो त्यावेळी ते खूप दयाळू होते. ते कायमच माझ्या तब्येतीची विचारपूस करायचे. आमच्या दोघांच्याही संभाषणावरून मला कधी ते डिप्रेशनमध्ये असल्याचे जाणवले नाही. ते मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत कसे वागायचे, याबद्दल मला माहित नाही." (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)

Samay Shah Reveals Gurucharan Singh Was Happy
Juna Furniture Collection : महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर'ची बॉक्स ऑफिसवर कमाल, पहिल्या विकेंडला कमावले कोट्यवधी रुपये

"मी कायमच त्याच्यासाठी त्याच्या मुलासारखाच होतो. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आणि करियरमध्ये अनेक गोष्टींचे उत्तम नियोजन केले होते. आमचं दोघांचंही एकमेकांच्या आयुष्यात काय घडतंय, यावर चर्चा व्हायची. ते एका पंजाबी चित्रपटासाठी काम करत होते. पण त्यांनी त्याबद्दल मला केव्हाही सांगितले नव्हते. कारण त्यांना मला सरप्राइज द्यायला आवडायचे."

"त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असायचो. मला वाटतंय की ते लवकरच परत येतील. त्यांचं आणि नातं खूप घनिष्ट आहे. त्यांना लहान मुलांसोबत खेळायला खूप आवडायचे. आम्ही दोघेही शेवटचे, दिलीप जोशी यांच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये भेटलो होतो. त्यानंतर आमची भेट झाली नाही. पण आता मला त्यांना भेटण्याची खूपच इच्छा आहे." (Entertainment News)

Samay Shah Reveals Gurucharan Singh Was Happy
Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com