Bigg Boss OTT 3 : "अरमान मलिकची बिग बॉसमधून हकालपट्टी करा", विशाल पांडेचे आई-वडील संतापले; नेमकं काय घडलं?

Armaan Malik And Vishal Pandey News : अरमान मलिक आणि विशाल पांडेच्या प्रकरणावर विशालच्या आई- वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अरमानला घरातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे.
Bigg Boss OTT 3 Latest News
Vishal Pandey Parents Demand Remove Armaan Malik From Bigg Boss OTT 3Saam Tv

'बिग बॉस ओटीटी ३'मध्ये चांगलाच धमाका पाहायला मिळत आहे. टॅरो कार्ड रिडर मुनीषा खटवानीचा शोमधील प्रवास संपुष्टात आला. नुकत्याच झालेल्या "विकेंड का वार"मध्ये अनिल कपूर स्पर्धकांवर चांगलाच बरसला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अरमान आणि विशाल प्रकरणावरही अनिल कपूरने दोघांचीही चांगलीच कानउघडणी केली आहे. आता या प्रकरणावरून सोशल मीडियावर विशालच्या समर्थनार्थ अरमान मलिकला अनेक नेटकरी ट्रोल करीत आहेत. अशातच विशाल पांडेच्या आई- वडिलांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Bigg Boss OTT 3 Latest News
Munisha Khatwani Eliminated : बिग बॉसच्या घरातून मुनिषा खटवानी नॉमिनेट, बिग बॉसने अरमान मलिकला सुनावली मोठी शिक्षा

नुकतंच त्यांनी 'विरल भयानी'या इन्स्टा पेजसोबत बोलत असताना प्रतिक्रिया दिलेली आहे. विशालच्या आई- वडीलांनी न्यायाची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलंय, "बिग बॉस प्लिज आमची एक मागणी आहे. ज्या माणसाने आमच्या मुलावर हात उगारला आहे, त्याला घरातून बाहेर काढा. आजवर आम्ही त्याच्या अंगावर केव्हाच हात उगारलेला नाही. त्याला आम्ही आजवर खूप प्रेमाने वाढवलं आहे. त्याच्या अंगावर बिग बॉसच्या घरात कोणी हात उगारेल, असा विचार करून आम्ही त्याला पाठवलं नव्हतं. ही घटना आमच्यासाठी खूपच वाईट आहे. त्याला मारलं आहे, हे ऐकून मी खूप अस्वस्थ झाली आहे."

या प्रकरणावर विशाल पांडेच्या वडिलांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "सध्या सर्वत्र विशालच्या पर्सनॅलिटीबद्दल खूप चर्चा सुरू आहे. त्याची पर्सनॅलिटी खोटी आहे. असं बोललं जात आहे. पण तसं काहीही नाही. तो जसा आहे, तसा तुमच्या समोर आहे. तुम्हाला दिसत असलेला त्याचा हा खोटा चेहरा नाही, जे आहे ते खरं आहे. त्यासोबतच कृतिका मलिक प्रकरणावर त्याच्यावर खोटे आरोप लावले जात आहे. माझ्या मते, कोणाच्या सौंदर्याचे कौतुक करणं काही वाईट नाही. त्याने जे काही आहे, थेट बोलला आहे. माझ्या मुलाच्या कानाखाली मारल्यामुळे अरमान मलिकवर कारवाई व्हायला हवी. माझी बिग बॉस आणि निर्मात्याकडे विनंती आहे की, त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी. त्याला घरातून बाहेर काढा."

Bigg Boss OTT 3 Latest News
Alia Bhatt On Raha Kapoor : दोन वर्षांच्या राहा कपूरला पुस्तकांची आवड, आई आलियाने सांगितल्या लेकीच्या आवडीनिवडी

सोशल मीडिया एनफ्लुएन्सर अरमान मलिक यांच्या दोन्ही बायकांसोबत 'Bigg Boss OTT 3'च्या घरामध्ये सहभागी झाला आहे. विशाल पांडेने अरमानची दुसरी बायको कृतिका मलिक हिला "भाभी तुम्ही विना मेकअप देखील खूप सुंदर दिसता." अशी कमेंट त्याने लवकेशच्या समोरही आणि कृतिकाच्याही समोर केली होती. या कमेंटमुळे बिग बॉसच्या घरात खूपच वादंग निर्माण झाला होता. शनिवारी झालेल्या एपिसोडमध्ये अरमानने विशालच्या कानाखाली दिली होती.

Bigg Boss OTT 3 Latest News
Neetu Singh Birthday : १५ वर्षांच्या नीतू सिंह २१ वर्षांच्या ऋषी कपूरच्या पडल्या प्रेमात; आईचा विरोध असूनही झाली सक्सेस लव्हस्टोरी, जाणून घ्या...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com