इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

Iran Lays Naval Mines in Hormuz Strait : होर्मुझ सामुद्रधुनीत इराणनं अमेरिकेला उद्धवस्त करण्यासाठी चक्क सुरुंग पेरलेत.मात्र ते जलसुरुंग नेमके कोणते आहेत ? ते इराणनं कसे पेरले? यावरुन अमेरिकेनं इराणला काय इशारा दिलाय?पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?
Published On

समुद्राच्या हजारो फूट खाली, अंधारात लपलेली एक पाणबुडी आणि तिला उद्ध्वस्त करण्यासाठी पेरलेलं जलसुरुंग. हे 'द गाझी अटॅक' चित्रपटातील थरार दृश्य तुम्हाला आठवतयं. याचं चित्रपटाप्रमाणे इराणनंही होर्मुझ सामुद्रधुनीत शत्रूला उद्धवस्त करण्यासाठी जलसुरुंग तयार केलेत. होर्मुझ सामुद्रधुनीतून जगाला तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतुक केली जाते. मात्र इराणनं याचं सामुद्रधुनीत जलसुरुंग पेरल्यानं अमेरिकेला चांगलाच धक्का बसलाय. इराणनं समुद्रात पाण्याखाली किती जलसुरुंग लावलेत. पाहूयात.

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?
युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

नेवल माइंस- शत्रूची जहाजे आणि पाणबुड्या नष्ट करण्यासाठी किंवा शत्रूचा मार्ग रोखण्यासाठी या माईन्स पाण्याखाली लावल्या जातात..

लिम्पेट माईन्स- हे डायव्हर किंवा स्पेशल फोर्सेसद्वारे जहाजाच्या खालच्या भागाला चिकटवलं जातं आणि एका ठराविक वेळेनंतर याचा स्फोट होऊन जहाज उद्धवस्त केले जाते...

इन्फ्लुएंस माईन्स- ..हे जलसुरुंग सिग्नलद्वारे ट्रिगर होते...जहाजाच्या चुंबकीय आणि आवाजाच्या दाबामुळे या माईन्सचा स्फोट होतो...

मूर्ड माईन्स- हे समुद्रतळाशी जोडलेले असून पाण्याखाली एका निश्चित खोलीवर हे जलसुरुंग पेरलेले असतात. जहाजांवर आदळल्यावर या माईन्सचा स्फोट होतो.

बॉटम माईन्स- . हे सेन्सर भू कंपनं, आवाज आणि चुंबकीय सिग्नलद्वारे स्फोट घडवून आणतात.. यात शेकडो किलोग्रॅम स्फोटके असतात.

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?
LPG Cylinder: बुकिंग केल्यानंतर LPG सिलिंडर किती दिवसानंतर मिळेल? गॅस टंचाईदरम्यान सरकारनं दिली नवी अपडेट

दरम्यान इराणनं असे असंख्य जलसुरुंग होर्मुझ सामुद्रधुनीत पेरल्याची चर्चा आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल निर्यात करू देणार नाही, असा इशाराही इराणनं दिलयं. इराणनं हे जलसुरुंग चीन, रशिया, उत्तर कोरियाच्या मदतीनं डिझाईन केलेत. 2020 आधी सेंटर फॉर इंटरनॅशनल मेरीटाईम सिक्युरिटीने इराणकडे 2,000 ते 5,000 जलसुरुंग असल्याचं सांगितलं होते गेल्या काही वर्षात हा आकडा वाढलेलाही असू शकतो..दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जलसुरुंगांवरून इराणला काय इशारा दिलाय. पाहूयात.

इराणनं होर्मुझ सामुद्रधुनीत जलसुरुंग पेरण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. जर त्यांनी होर्मुझमध्ये जलसुरुंग पेरले असतील तर ते तात्काळ काढून टाकावेत. अन्यथा अमेरिका इराणवर मोठा विध्वंसक हल्ला घडवून आणेल.

दरम्यान होर्मुझ सामुद्रधुनीत जलसुरुंग पेरणाऱ्या इराणच्या 16 जहाजांना उद्धवस्त केल्याचा दावा अमेरिकनं लष्करानं केलाय. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिका इराणच्या या जलसुरुंगांना कसं रोखणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील या युद्धामुळे तेलाचे ग्राहक असणाऱ्या आशियाई देशांमध्ये नेमका काय परिणाम होणार? याकडे जगाचं लक्ष लागलयं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com