Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

Fake Currency Racket In Chandrapur : चंद्रपूर पोलिसांनी ऊर्जानगरमधील एका अपार्टमेंटमधून बनावट नोटा बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. छाप्यादरम्यान ९१.१५ लाख रुपयांच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
Fake Currency Racket In Chandrapur :
Fake currency printing house exposed in an apartment in Chandrapur's Urjanagar area; police seize fake currency worth Rs 91 lakh.saam tv
Published On
Summary
  • चंद्रपूरच्या उर्जानगर परिसरात बनावट नोटांचा छापखाना उघड.

  • पोलिसांनी ५०० रुपयांच्या ९१ लाख १५ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

  • स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत रॅकेटचा पर्दाफाश.

संजय तुकराम, साम प्रतिनिधी

सोलापूरनंतर आता चंद्रपुरात बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. एक दिवासापूर्वीच सोलापूरमध्ये बनावट नोटा बनवणारे सापडले होते, त्यानंतर आता चंद्रपूर शहरात बनावट नोटा छापून त्या बाजारात चलनात आणण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंद्रपूर शहरातील उर्जानगर परिसरात बनावट नोटा छापण्याच्या कारखाना सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेला याची मिळाल्यानंतर त्यांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला.

Fake Currency Racket In Chandrapur :
Beed: पोलिस दलात खळबळ! बीडमध्ये ACBची मोठी कारवाई, २ पोलिस अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

राजश्री अपार्टमेंटमधील फ्लॅटवर छापा टाकत पोलिसांनी ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे तब्बल ९१ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मध्यप्रदेशातील एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. १० मार्च रोजी उर्जानगर मेजर गेट परिसरातील ‘राजश्री अपार्टमेंट’ येथे काही व्यक्ती अवैधरित्या बनावट नोटा तयार करत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २०३ वर छापा टाकला.

Fake Currency Racket In Chandrapur :
नागपूरनंतर सोलापुरात बनावट नोटांचा सुळसुळाट; पोलिसांकडून विक्री करणारी टोळी जेरबंद, अशी अडकली जाळ्यात

हाती आलेल्या माहितीनुसार हा फ्लॅट बंगाली कॅम्प परिसरातील सुमित पॉल यांचा आहे. त्यांनी एक महिन्यापूर्वी मध्यप्रदेशातील काही व्यक्तींना भाड्याने दिला होता. पोलिसांनी फ्लॅटची झडती घेतली असता आतमध्ये बनावट नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. दरम्यान या कारवाईत पोलिसांनी भारतीय चलनाच्या ५०० रुपयांच्या हुबेहुब दिसणाऱ्या बनावट नोटांचे १० बॉक्स जप्त केले.

नोटा छापण्यासाठी वापरला जाणारा एप्सन कंपनीचा कलर प्रिंटर आणि इतर साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ९१ लाख १५ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी मध्यप्रदेशातील शुभम दिनेश नागर (वय २६) या आरोपीला ताब्यात घेतले आहे. बनावट नोटा तयार करून फसवणूक करण्याच्या उद्देशाने हा प्रकार सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेप्रकरणी दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com