Kalki 2898 AD Instagram
मनोरंजन बातम्या

प्रभास- दीपिकाच्या 'Kalki 2898 AD'ची छप्परतोड कमाई; शाहरुखच्या 'Jawan'लाही मागे टाकलं, पहिल्या आठवड्याला किती कमावले?

Kalki 2898 AD Movie Day 5 Collection : प्रभास- दीपिका पदुकोणच्या 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ सुरू आहे. चित्रपटाने शाहरूख खानच्या 'जवान' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडित काढला आहे.

Chetan Bodke

सध्या प्रभास- दीपिका पदुकोणच्या 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ सुरू आहे. चित्रपटाने जगभरामध्ये ५०० कोटींचा टप्पा पार केलेला आहे. चित्रपटाने पुन्हा एकदा शाहरूख खानचा 'जवान' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडित काढलेला आहे.

प्रभास- दीपिकाच्या 'कल्की २८९८ एडी'ने पहिल्याच विकेंडला ५५५ कोटी रुपये कमावले आहेत. तर शाहरूख खानच्या 'जवान' चित्रपटाने पहिल्या विकेंडला ५२०. ७९ कोटींची कमाई केलेली होती. चित्रपटाला सध्या जगभरामध्ये चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. जाणून घेऊया चित्रपटाच्या कमाईबद्दल...

६०० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग आश्विन केले आहे. अमिताभ बच्चन, कमल हसन, प्रभास, दीपिका पदुकोण, दुल्कर सलमानसह अनेक सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत आहे. टॉलिवूडसह बॉलिवूडमधील तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना या चित्रपटामध्ये पाहायला मिळत आहे. सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने चित्रपटाचा पाच दिवसांच्या कमाईचा आकडा शेअर केलेला आहे. चित्रपटाने पाच दिवसांत ३४३ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाची सर्वाधिक कमाई तेलुगु आणि हिंदी भाषेमधीलच आहे. तर चित्रपटाने पाच दिवसांत चित्रपटाने जगभरात ६०० कोटींच्या आसपासची कमाई केलेली आहे.

चित्रपटाने पहिल्या दिवशीच सर्वाधिक कमाई केलेली होती. पण त्यानंतर चित्रपटाने थोडी कमीच कमाई केलेली दिसत आहे. सायफाय चित्रपटामध्ये प्रेक्षकांना भगवान विष्णू यांचा दहावा अवतार असलेल्या कल्कीवर आधारित हा चित्रपट आहे. २०२४ मधील बिगबजेट चित्रपटांच्या यादीत ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाचा समावेश झालेला आहे. चित्रपटामध्ये AI टेक्नोलॉजी, ग्राफिक्स, ॲनिमेशन सारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे. 2D सोबतच हा चित्रपट IMAX आणि 3D फॉर्मेटमध्येही रिलीज झालेला आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, दुल्कर सलमान, कमल हसन, दिशा पटानी अशी तगडी स्टारकास्ट आहे. प्रेक्षक, सेलिब्रिटी आणि समीक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT