भरत मोहळकर, साम टिव्ही, प्रतिनिधी
टेस्लाचे आणि 'X' चा सीईओ एलन मस्कने EVM बाबत संशय व्यक्त करणारं ट्वीट केलं आणि देशात खळबळ उडालीय. असोसिएट प्रेसनुसार ईव्हीएममध्ये गडबड होत असल्याच्या चर्चा असल्याचं ट्वीट केलं होतं. त्याला रिट्विट करीत एलन मस्कने AI द्वारे EVM हॅक होण्याचा संशय व्यक्त केलाय.
एलन मस्क म्हणाला आहे की, आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन बंद करायला हवी. ती मानवी हस्तक्षेपाने किंवा AIने हॅक करण्याचा धोका आहे. हा धोका सध्या कमी वाटत असला तरी खूप मोठा आहे.
एलन मस्कने EVMवर संशय व्यक्त केल्यानंतर विरोधकांना आयतं कोलित मिळालंय. राहुल गांधींनीही ट्वीट करून EVM एक ब्लॅक बॉक्स असून त्याच्या सत्यतेच्या तपासणी करण्याची परवानगी नाही. तेव्हा ती एक फसवणूक असल्याची टीका राहुल गांधींनी केलीय. तर एलॉन मस्कनं फुकटचे सल्ले देऊ नये असा खोचक टोला एनडीएचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलाय.
लोकसभा निवडणूकीपुर्वी सुप्रीम कोर्टाने ईव्हिएमच्या वापराला स्थगिती देण्यास नकार दिला होता. मात्र आता जागतिक पातळीवरून ईव्हिएमवर संशय व्यक्त केल्यानं पुन्हा ईव्हीएमच्या मुद्दा ऐरणीवर आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.