VIDEO: सांगलीत रंगणार वर्चस्वाची लढाई, विशाल पाटील-विश्वजित कदम यांच्या टार्गेटवर जयंत पाटील

Vishal Patil Vs Jayant Patil: सांगली लोकसभा निवडणूकीत विजयी झाल्यानंतर खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदमांनी आपला मोर्चा आता थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या इस्लामपूर मतदारसंघाकडे वळवलाय.
सांगलीत रंगणार वर्चस्वाची लढाई, विशाल पाटील-विश्वजित कदम यांच्या टार्गेटवर जयंत पाटील
Vishal Patil and Vishwajeet Kadam Vs jayant patilSaam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही, साम टीव्ही

सांगली लोकसभा निवडणुकीत विशाल पाटलांचा विजय झाला. मात्र विजयानंतर विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी जयंत पाटलांनाच आव्हान दिलंय. तर आता इस्लामपूर-वाळवा मतदारसंघावर आमचं जेवढं लक्ष नव्हतं. त्याच्या 10 पट लक्ष देणार आहोत. तसंच या मतदारसंघात आता नवे निर्णय घ्यावे लागतील, असं म्हणत जयंत पाटलांना इस्लामपूर मतदारसंघात जाऊन खुलं आव्हान दिलंय. त्यामुळे सांगलीत पुन्हा एकदा वर्चस्वाची लढाई रंगलीय.

महाविकास आघाडीतील जागा वाटपात सांगलीची जागा ही ठाकरे गटाला सोडण्यात आली. यामागे जयंत पाटील हे सूत्रधार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र हे आरोप जयंत पाटलांनी निवडणुकीदरम्यान फेटाळले होते. त्यानंतर विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी विश्वजित कदमांनी जोरदार प्रयत्न केले.

सांगलीत रंगणार वर्चस्वाची लढाई, विशाल पाटील-विश्वजित कदम यांच्या टार्गेटवर जयंत पाटील
OBC Reservation: आरक्षणाच्या मुद्द्यावर OBC समाजाचा एल्गार; विधानसभेच्या २८८ जागा लढवणार

मात्र त्यानंतरही उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटलांनी बंडखोरी केली आणि सांगलीतून 1 लाख मतांनी विजय मिळवला. मात्र कदम आणि विशाल पाटलांचा जयंत पाटलांवरचा राग कमी व्हायला तयार नसल्याचं दिसतंय. त्यामुऴेच आता सांगलीत सत्कार व्हायच्या आधी आम्ही इस्लामपूर मतदारसंघात आल्याचं सांगत आगामी काळात जयंत पाटलांना आव्हान देण्याचे संकेत विशाल पाटलांनी दिलेत.

सांगलीत विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्या घराण्यातला पारंपरिक वाद आता पुढच्या पिढीतही सुरू झालाय. त्यामुळे लोकसभेच्या तिकीटावरून जयंत पाटलांनी विशाल पाटलांना शह दिल्याची चर्चा होती. मात्र विशाल पाटलांनी विजय मिळवल्यामुळे जयंत पाटलांनाच सर्वात मोठा धक्का मानला गेला.

सांगलीत रंगणार वर्चस्वाची लढाई, विशाल पाटील-विश्वजित कदम यांच्या टार्गेटवर जयंत पाटील
Nursing exam: सकाळी यूपीएससीचा, तर संध्याकाळी नर्सिंग परीक्षेचा गोंधळ; परीक्षा केंद्रावर महिला आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची

आता कदम आणि पाटलांनी थेट जयंत पाटलांना त्यांच्या बालेकिल्ल्यात खुल आव्हान दिल्यामुळे ही आगामी विधानसभेच्या संघर्षाची नांदी समजली जातेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com