Nursing exam: सकाळी यूपीएससीचा, तर संध्याकाळी नर्सिंग परीक्षेचा गोंधळ; परीक्षा केंद्रावर महिला आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची

Chhatrapati Sambhajinagar Nursing Exam: छत्रपती संभाजीनगरमध्ये चिकलठाणा भागात असणाऱ्या आय ऑन डिजिटल या परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.
सकाळी यूपीएससीचा, तर संध्याकाळी नर्सिंग परीक्षेचा गोंधळ; परीक्षा केंद्रावर महिला आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची
Chhatrapati Sambhajinagar Nursing ExamSaam Tv

रामू ढाकणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर शहरात आज सकाळी यूपीएससी परीक्षेत गुगल मॅप लोकेशन वरून अनेक विद्यार्थ्यांना यूपीएससीच्या परीक्षेपासून वंचित राहावं लागलं. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा शहरातील चिकलठाणा भागात असणाऱ्या आय ऑन डिजिटल या परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.

या परीक्षा केंद्रावर आज एएनएम नर्सिंगची परीक्षा होती. मात्र मात्र विवाह झाल्यानंतर अनेक महिलांना त्यांच्या प्रवेश पत्रावरील नाव आणि आधार कार्ड किंवा ईतर ओळखीच्या पुराव्यात तफावत आढळून आल्याने परीक्षा केंद्रात येण्यास नकार दिल्याचं दिसून आलंय. त्यानंतर परीक्षा केंद्रावरील सुरक्षारक्षकांनी शटर लावून घेतलं त्यावेळी परीक्षा देण्यासाठी आलेल्या आणि सुरक्षारक्षक यांच्यात बाचाबाची झाल्याच पाहायला मिळालं.

सकाळी यूपीएससीचा, तर संध्याकाळी नर्सिंग परीक्षेचा गोंधळ; परीक्षा केंद्रावर महिला आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची
Police Bharti 2024: पोलीस भरतीची मैदानी प्रक्रिया पुढे ढकला, खासदार निलेश लंकेंचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; काय सांगितलं कारण?

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने या परीक्षा केंद्रावर दाखल झाले आहेत. प्रशासनाकडून या महिलांना सर्व प्रकारच्या पूर्वसूचना प्रवेश पत्रावर देण्यात आल्या होत्या मात्र, या सगळ्या प्रकारानंतर 25 ते 30 महिला या परीक्षेपासून वंचित राहिल्याची माहिती मिळत आहे.

सकाळी यूपीएससीचा, तर संध्याकाळी नर्सिंग परीक्षेचा गोंधळ; परीक्षा केंद्रावर महिला आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची
Police Bharti 2024: पोलीस भरतीची मैदानी प्रक्रिया पुढे ढकला, खासदार निलेश लंकेंचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; काय सांगितलं कारण?

दरम्यान, आज संपूर्ण देशभरात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा झाली. यातच छत्रपती संभाजीनगरमध्ये गुगल मॅपच्या लोकेशनमुळे यूपीएससीच्या परीक्षेपासून वंचित राहिल्याचा आरोप अनेक विद्यार्थ्यांनी केलाय. छत्रपती संभाजीनगर शहरातील विवेकानंद कॉलेजात 2 ते 3 मिनिटे उशिरा आल्यानं त्यांना प्रवेश नाकारण्यात आलाय. वर्षानुवर्ष अभ्यास करून आलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी अश्रू अनावर झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com