Police Bharti 2024: पोलीस भरतीची मैदानी प्रक्रिया पुढे ढकला, खासदार निलेश लंकेंचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; काय सांगितलं कारण?

Nilesh Lanke On Police Bharti 2024: खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून पोलीस भरतीची मैदानी प्रक्रिया पुढे ढकलावी, अशी मागणी केली आहे.
पोलीस भरतीची मैदानी प्रक्रिया पुढे ढकला, खासदार लंकेंचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; काय सांगितलं कारण?
Nilesh Lanke On Police Bharti 2024Saam Tv

सुशील थोरात, साम टीव्ही, प्रतिनिधी

पोलीस भरती प्रक्रिया संर्दभात एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी पोलीस भरतीची मैदानी प्रक्रिया पुढे ढकलावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.

त्यांनी 19 जूनपासून सुरु होणारी पोलीस भरती मैदानी प्रक्रिया पाऊसाळ्या अभावी पुढे ढकलण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. पाऊसामुळे मैदानात चिखल झाल्याने उमेदवारांना मैदानी चाचणी देणे कठीण जाणार असल्याने ही प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पोलीस भरतीची मैदानी प्रक्रिया पुढे ढकला, खासदार लंकेंचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; काय सांगितलं कारण?
VIDEO: विधानसभा निवडणुकीआधी मंत्रिमंडळ विस्तार, फुटीच्या भीतीनं महायुतीचा निर्णय? मंत्रिमंडळात कुणाची वर्णी?

निलेश लंके यांनी पत्रात काय लिहिलं?

मुख्यमंत्री शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात निलेश लंके यांनी लिहिलं आहे की, ''पावसाळा ऋतु असल्याने दिवसभर पावसाचे, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचे वातावरण आहे. हवामान खात्याने देखील पुढील काही दिवस पावसाचे वातावरण सांगितलेले आहे. राज्यात पावसाचे वातावरण असल्याने व पाऊस झाल्याने पोलीस भरती मैदानी चाचणीवर त्याचा परिणाम होवू शकतो.''

पत्रात लिहिलं आहे की, ''सध्या अनेक ठिकाणी मागील आठवड्यापासून पाऊस पडत असल्याने भरती प्रक्रियेसाठी मैदानी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सराव करता आलेला नाही. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वी मोकळ्या मैदानावर सराव केला असून पावसामुळे चिखल झालेल्या मैदानावर मैदानी चाचणी देणे, त्यांना कठीण जाणार आहे.''

पोलीस भरतीची मैदानी प्रक्रिया पुढे ढकला, खासदार लंकेंचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; काय सांगितलं कारण?
VIDEO: शिंदे गटाच्या लोकांकडे EVM अनलॉकचं अॅप, आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप

यात पुढे लिहिलं आहे की, ''पाऊसात व चिखलात मैदानी चाचणी देणे धोक्याचे असून यामुळे विद्यार्थ्यांना दुखापतही होऊ शकते. मैदानी चाचणीच्या दिवशी अचानक पाऊस आल्याने भरती प्रक्रिया प्रभावीत होवून त्याचा परिणाम वर्षानुवर्षे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणार आहे. भरती प्रक्रिया होणाऱ्या ठिकाणी जर पाऊस असले व पुरेशी व्यवस्था नसेल तर तेथे अस्वच्छता पसरून त्या परिसरामध्ये रोगराई पसरू शकते. तर पावसात भिजल्याने जंतुसंसर्ग होवून भरतीसाठी आलेले तरूण आजारी पडू शकतात. यामुळे पोलीस भरती मैदानी चाचणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी.''

सुशील थोरात, साम टीव्ही, प्रतिनिधी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com