VIDEO: विधानसभा निवडणुकीआधी मंत्रिमंडळ विस्तार, फुटीच्या भीतीनं महायुतीचा निर्णय? मंत्रिमंडळात कुणाची वर्णी?

Maharashtra Cabinet Expansion: आगामी विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकराचं मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतं. यामध्ये कोणत्या आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते, हे जाणून घ्या...
विधानसभा निवडणुकीआधी मंत्रिमंडळ विस्तार, फुटीच्या भीतीनं महायुतीचा निर्णय? मंत्रिमंडळात कुणाची वर्णी?
Maharashtra Cabinet ExpansionSaam Tv
Published On

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. याबाबत तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. बऱ्याच काळापासून आमदार मंत्रीपद मिळण्याची वाट पाहत आहेत. मात्र अद्याप राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीत. त्यामुळे काही आमदार नाराज असल्याची माहिती आहे.

त्यामुळे आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीआधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय महायुतीतील प्रमुख नेते घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीआधी मंत्रिमंडळ विस्तार, फुटीच्या भीतीनं महायुतीचा निर्णय? मंत्रिमंडळात कुणाची वर्णी?
VIDEO: शिंदे गटाच्या लोकांकडे EVM अनलॉकचं अॅप, आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप

याचबद्दल बोलताना शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की, ''विधानसभा अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे. अनेक दिवसांपासून हा विस्तार रखडलेला आहे.''

शिदे गटातून मंत्रिमंडळात कुणाची वर्णी?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिदे गटातून आशिष जैस्वाल, संजय शिरसाट, भरत गोगावले यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते. याशिवाय लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिणमधून पराभूत झालेल्या यामिनी जाधव आणि लता सोनावणे यांनाही मंत्रिपद मिळू शकतं.

विधानसभा निवडणुकीआधी मंत्रिमंडळ विस्तार, फुटीच्या भीतीनं महायुतीचा निर्णय? मंत्रिमंडळात कुणाची वर्णी?
Praful Patel News: विधानसभेला राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा येणार? प्रफुल पटेलांनी मोठा आकडा सांगितला; म्हणाले...

राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळात कोणाला संधी?

अजित पवार गटाकडून इंद्रनील नाईक, अण्णा बनसोडे, संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळू शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच भाजपकडून आमदार नितेश राणे, माधुरी मिसाळ, मनीषा चौधरी, संजय कुटे, राणाजगजित सिंह पाटील आणि देवयानी फरांदे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com