Shivsena: कारभारात सुधारणा करा अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, शिवसैनिकांचा कल्याण महावितरणला इशारा

kalyan shivsena morcha at mahavitaran office: ज्या भागात वीज चोरी होते त्या भागातील भार नियमितपणे बिल भरणा-या ग्राहकांवर का असा सवाल शिवसैनिकांनी महावितरण अधिका-यांना केला.
kalyan shivsena andolan at mahavitaran office
kalyan shivsena andolan at mahavitaran officeSaam Digital

- अभिजीत देशमुख

महावितरणच्या कारभाराविरोधात आज (शनिवार) शिवसेनेने कल्याण शहरातील महावितरण कार्यालयात धडक देत अधिका-यांना जाब विचारला. कर्मचाऱ्यांची वागणूक सुधारा अन्यथा कार्यालयात शिवसेना आपल्या पद्धतीने आंदाेलन करेल आणि त्यानंतर कार्यालयास नवीन फर्निचर घ्यावे लागेल असा सज्जड इशारा शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी महावितरणला निवेदनाद्वारे दिला.

कल्याण शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून महावितरणचा अयाेग्य कारभार सुरू असल्याचा आराेप पाटील यांनी केला. वारेमाप वीज बिल आकारणी, दरवर्षी आकारण्यात येणारे सेक्युरिटी डिपॉझिट, वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे, विज कर्मचाऱ्यांचे ग्राहकांशी उद्धट वागणूक,स्मार्ट मीटर अशा अनेक समस्यांनी ग्राहक त्रासल्याचे पाटील यांनी नमूद केले.

kalyan shivsena andolan at mahavitaran office
APMC Market Vashi: 'एपीएमसी'च्या पदपथावर बदामांचं पॅकिंग, प्रशासनाची डाेळेझाक? Video Viral

शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी अव्वा सव्वा विज बिल तसेच दरवर्षी आकारण्यात येणाऱ्या सेक्युरिटी डिपॉझिटला विरोध केला. याबाबत निर्णय घेण्याची मागणी महावितरणकडे पाटील यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

kalyan shivsena andolan at mahavitaran office
Kolhapur Bus Accident: शैक्षणिक सहलीच्या बसला अपघात, मुलींचा आक्राेश; कर्नाटक पाेलिस धावले कोल्हापुरातील विद्यार्थ्यांच्या मदतीला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com