Virar News: विद्युत पुरवठ्यासाठी बरफपाडामधील नागरिकांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा,नाेंदविला कारभाराचा निषेध

Barafpada Citizens Morcha At Mahavitran Office Near Virar: गेल्या दहा दिवसांपासून या समस्येला आम्ही सामोरे जात असून महावितरणचे अधिकारी तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
Virar News: विद्युत पुरवठ्यासाठी बरफपाडामधील नागरिकांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा,नाेंदविला कारभाराचा निषेध
Barafpada Citizens MorchaSaam Tv

- महेंद्र वानखेडे

विरार पूर्वेच्या बरफपाडा भागात गेल्या आठ दिवसांपासून सुरळीत विद्युत पूरवठा हाेत नसल्याने संतप्त नागरिकांनी आज (गुरुवार) महावितरण कार्यालय गाठत अधिका-यांना धारेवर धरले. लवकरात लवकर विद्युत पूरवठा सुरळीत हाेण्यासाठी काम करावे अन्यथा तीव्र आंदाेलन छेडू असा इशारा नागरिकांनी महावितरण अधिका-यांना दिला.

विरारमध्ये ऐन उकाड्याच्या दिवसांत विजेच्या समस्येमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चात गृहिणींचा मोठ्या संख्येने सहभाग हाेता.

Virar News: विद्युत पुरवठ्यासाठी बरफपाडामधील नागरिकांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा,नाेंदविला कारभाराचा निषेध
चर्चाच चर्चा! खासदार निलेश लंकेंच्या पत्नी विधानसभा निवडणूक लढणार?

विरार पूर्वेच्या बरफपाडा येथील चाळींमध्ये शेकडो घर आहेत. येथे कमी क्षमता असलेला ट्रान्सफॉर्मर महावितरणने बसवल्यामुळे दिवसाच्या 24 तासांपैकी अर्धा तास लाईट असते. त्याशिवाय अधून मधून विद्युत दाब वाढताे. त्यामुळे घरातील टिव्ही, इंव्हरटर व फ्रिज खराब झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी साम टीव्हीशी बाेलताना केल्या.

Edited By : Siddharth Latkar

Virar News: विद्युत पुरवठ्यासाठी बरफपाडामधील नागरिकांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा,नाेंदविला कारभाराचा निषेध
मी अपरिपक्व नाही! नितेश राणेंच्या रत्नागिरी मतदारसंघाच्या दाव्यावर उदय सामंतांचा टाेला,Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com