- सुशील थोरात
महावितरण कंपनीने कामकाजात सुधारणा करावी यासाठी आज (साेमवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगर येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी माेर्चेकरांनी महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना मेणबत्ती आणि गॅसबत्ती देऊन महावितरण कार्यालयाच्या कामाचा निषेध नाेंदविला. (Maharashtra News)
नगर शहरातील विद्युत पुरवठा गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होत आहे. उन्हाळ्यात नागरिकांचे यामुळे चांगलेच हाल झाले आहेत. पावसाळ्यातही वीज वितरण कंपनीच्या खांबावर झाडे पडून अनेक वेळा वीज खंडित होते. त्यामुळे ही नागरिकांचे प्रचंड हाल होत असतात.
त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्याआधीच महावितरण कार्यालयाने वीजपुरवठा अखंडपणे कसा सुरळीत राहील याची काळजी घ्यावी. सध्या सुरू असलेल्या विजेचा खेळ खंडोबा त्वरित थांबवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना करण्यात आली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जर पुढील काळात महावितरण कंपनीच्या वतीने सुरू असलेले कामकाज सुधारले नाही आणि वीज खंडित झाल्यामुळे नागरिकांची हाल असेच सुरू राहिले तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.