पिंपरी-चिंचवडमध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग, 3 BHK फ्लॅट जळून खाक

Pimpri Chinchwad Fire News : आम्ही घटनास्थळी पाेहचल्यानंतर प्रथम आजीची घरातून सुटका केली. ही आग संपुर्णत: विझविण्यात आली आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी दिली.
fire breaks out in flat at aranyeshwar housing society pimpri chinchwad
fire breaks out in flat at aranyeshwar housing society pimpri chinchwad Saam Digital

पिंपरी चिंचवड शहरातील शाहूनगर परिसरातील अरणेश्वर हाउसिंग सोसायटी मधील एका फ्लॅटला आज (साेमवार) दुपारी भीषण आग लागली. या आगीत एक 3 बीचएकके फ्लॅट संपुर्णत: जळून खाक झाला. या घटनेत काेणतीही जिवीत हानी झालेली नसून आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. (Maharashtra News)

अरणेश्वर हाउसिंग सोसायटी मधील दुपारी एक वाजता दरम्यान ए विंग मधील पहिल्या म्हजल्यावरील फ्लॅट नंबर 3 च्या बेडरूमला भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पाेहचले.

fire breaks out in flat at aranyeshwar housing society pimpri chinchwad
Shivrajyabhishek Sohala 2024 : शिवराज्याभिषेक सोहळ्याला आचारसंहितेचा अडसर? सरकारने मार्ग काढावा : संभाजीराजे

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. या फ्लॅटमधील बेडरूमला लागलेल्या आगीमुळे संपुर्ण साहित्य जळून खाक झाला आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी बालाजी वैद्य म्हणाले आम्ही घटनास्थळी पाेहचल्यानंतर प्रथम आजीची घरातून सुटका केली. ही आग संपुर्णत: विझविण्यात आली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

fire breaks out in flat at aranyeshwar housing society pimpri chinchwad
Swargate Bus Stand: प्रवासी संतापले, स्वारगेट स्थानकातून बस नव्हे हाेड्या चालवा; चिखल राडाराेड्यामुळे एसटी कर्मचा-यांचे आराेग्य धाेक्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com