मी अपरिपक्व नाही! नितेश राणेंच्या रत्नागिरी मतदारसंघाच्या दाव्यावर उदय सामंतांचा टाेला,Video

नितेश राणे यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याची त्यांनी खात्री करावी. देवेंद्रजींकडे तक्रार करावी, देवेंद्रजी योग्य ते बोलतील याची मला पूर्ण खात्री आहे असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
uday samant reaction on nitesh and nilesh rane demand of ratnagiri constituency
uday samant reaction on nitesh and nilesh rane demand of ratnagiri constituency Saam Tv

मतदारसंघ कुणाला सोडायचा, कोण उमेदवार असेल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपमधून देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीकडून अजित पवार हे ठरवतात. लोकशाहीमध्ये कोणालाही कुठलाही मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे. मी महायुतीतला एक जबाबदार मंत्री आहे, त्यामुळे मला यातून वाद वाढवायचा नाही अशी प्रतिक्रिया उद्याेग मंत्री उदय सामंत यांनी राणे बंधूंच्या रत्नागिरी, राजापूर मतदारसंघ मागणीवर केली.

आमदार नितेश राणे यांनी नारायण राणे खासदार हाेताच रत्नागिरी मतदारसंघावर दावा केला. उद्याेगमंत्री उदय सामंत यांच्‍या रत्‍नागिरी मतदारसंघावर दावा केल्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी राजापूर मतदारसंघावर दावा ठाेकला. राणे बंधूंच्या या भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटाचे समर्थकांसह आमदार भरत गाेगावले आक्रमक झाले. परंतु दूसरीकडे उद्याेग मंत्री उदय सामंत यांनी संयमाची भूमिका घेतली.

uday samant reaction on nitesh and nilesh rane demand of ratnagiri constituency
Vidhan Sabha Election: माेहिते पाटलांची माेठी घाेषणा, माढा विधानसभा निवडणुक लढणार नाही; उमेदवारही सांगितला

उदय सामंत म्हणाले मी नितेश राणेंचा यांच्या मताचा आदर करतो. त्याचा आदर करायचा की नाही हे नेते मंडळी ठरवतील. आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. त्यामुळे मला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही असेही सामंतांनी नितेश राणेंना टाेला हाणला.

Edited By : Siddharth Latkar

uday samant reaction on nitesh and nilesh rane demand of ratnagiri constituency
अमरावती : राजीनामा देऊ नका! शेकडाे कार्यकर्त्यांच्या भावनेनंतर प्रवीण पाेटेंची भूमिका जाहीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com