अमरावती : राजीनामा देऊ नका! शेकडाे कार्यकर्त्यांच्या भावनेनंतर प्रवीण पाेटेंची भूमिका जाहीर

navneet rana lost amravati lok sabha : पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता पाेटे हे राजीनामा मागे घेतील अशी चर्चा सभागृहात हाेती. परंतु बैठकीनंतरही प्रवीण पोटे हे राजीनाम्यावर ठाम राहिले आहेत.
navneet rana lost amravati lok sabha bjp city president pravin pote firm on his resignation
navneet rana lost amravati lok sabha bjp city president pravin pote firm on his resignation Saam Tv

- अमर घटारे

अमरावती लोकसभा मतदारसंघात खासदार नवनीत राणा यांचा झालेला पराभव भाजपच्या शहराध्यक्षांचा जिव्हारी लागला. शहराध्यक्ष प्रवीण पाेटे यांनी राणा यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत बुधवारी राजीनामा दिला. पाेटेंच्या राजीनाम्यानंतर अमरावती येथील भाजप कार्यकर्त्यांनी आज तातडीची बैठक बाेलावली. त्यानंतरही पाेटे आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेत.

अमरावती लाेकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना पराभवास समाेरे जावे लागले. राणा यांच्या पराभवाची जबाबदारी स्विकारुन भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण पोटे यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा बुधवारी दिला.

navneet rana lost amravati lok sabha bjp city president pravin pote firm on his resignation
Gadchiroli : गडचिरोलीत चकमक, पाेलिसांनी नक्षलवाद्यांना पळवून लावले, बाॅम्ब केले निकामी

आज अमरावतीत प्रवीण पोटे यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी पोटेंच्या कार्यालयात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्ते व पदाधिका-यांनी पोटे यांनी राजीनामा मागे घ्यावा अशा भावना व्यक्त केल्या.

दरम्यान पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता पाेटे हे राजीनामा मागे घेतील अशी चर्चा सभागृहात हाेती. परंतु बैठकीनंतरही प्रवीण पोटे हे राजीनाम्यावर ठाम राहिले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

navneet rana lost amravati lok sabha bjp city president pravin pote firm on his resignation
Vidhan Sabha Election: माेहिते पाटलांची माेठी घाेषणा, माढा विधानसभा निवडणुक लढणार नाही; उमेदवारही सांगितला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com