Vidhan Sabha Election: माेहिते पाटलांची माेठी घाेषणा, माढा विधानसभा निवडणुक लढणार नाही; उमेदवारही सांगितला

Madha Lok Sabha Election : माढा लाेकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशिल माेहिते पाटील यांनी पराभव केल्यानंतर या मतदारसंघास आता विधासभा निवडणुकीचे वेध लागलेत.
mohite patil family member will not contest vidhan sabha election from madha declares jaysinh
mohite patil family member will not contest vidhan sabha election from madha declares jaysinhSaam Digital

माढा विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटील घराण्यातील उमेदवार निवडणुक लढवणार नाही. जर राहिलाच तर माझा त्याला विराेध असणार असा जणू इशाराच स्वकीयांना जयसिंह मोहिते पाटील यांनी माध्यमांशी बाेलताना दिला.

जयसिंह माेहिते पाटील म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीत माढ्यातून स्थानिक कार्यकर्त्यांला संधी देणार आहाेत. त्या अनुषंगाने भैय्यांच्या म्हणजेच खासदार धैर्यशिल माेहिते पाटील यांच्या कार्यकर्त्याला तयारी करण्याची सूचना केल्याचे देखील जयसिंह यांनी नमूद केले.

mohite patil family member will not contest vidhan sabha election from madha declares jaysinh
चर्चाच चर्चा! खासदार निलेश लंकेंच्या पत्नी विधानसभा निवडणूक लढणार?

लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना 45 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत माढ्यातून मोहिते पाटील यांच्या घरातीलच उमेदवार असेल अशी चर्चा हाेती. त्यास काही अंशी आज जयसिंह यांनी ब्रेक लावला आहे.

जयसिंह म्हणाले स्थानिक कार्यकर्ता हा माढ्याचा आमदार असेल. त्याची आर्थिक स्थिती बेताची असली तरी आम्ही त्याच्या पाठिशी आहाेत. आम्ही निवडलेला उमेदवार निश्चित विजय मिळविले. त्याला तयारी करायला सांगितली आहे. आत्ताच त्याचे नाव सांगता येणार नाही. आमच्या मोहिते पाटील घरातील कोणीही निवडणूक लढवणार नाही असे ठामपणे जयसिंह यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

mohite patil family member will not contest vidhan sabha election from madha declares jaysinh
उदयनराजेंना अश्रू अनावर, पत्नी दमयंतीराजेंनी सावरलं; नेमकं काय घडलं जलमंदिर पॅलेसमध्ये? VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com