udayanraje bhosale thanked satara citizens for supporting him lok sabha election result
udayanraje bhosale thanked satara citizens for supporting him lok sabha election resultSaam Digital

उदयनराजेंना अश्रू अनावर, पत्नी दमयंतीराजेंनी सावरलं; नेमकं काय घडलं जलमंदिर पॅलेसमध्ये? VIDEO

Satara Lok Sabha Election Result 2024 : खासदार उदयनराजे भाेसले आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यात काटे टक्कर असून उदयनराजेंनी मताधिक्य घेतल्यानंतर राजे समर्थकांनी जल्लाेष केला.

आमदार शशिकांत शिंदे यांच्या विराेधात 9 हजार मतांची आघाडी घेतल्यानंतर एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज अशा घाेषणा देत शेकडाे कार्यकर्त्यांनी जलमंदिर पॅलेस येथे दाखल हाेत भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले यांना पॅलेसमधून बाहेर पडण्याची विनंती करत जल्लाेष केला.

सातारा लाेकसभा मतदारसंघात मतमाेजणीच्या पहिल्या फेरीपासून पिछाडीवर असलेल्या उदयनराजे भोसले यांनी 15 व्या फेरीत 9736 मतांची आघाडी घेतली. उदयनराजेंना 479304 मते तसेच शशिकांत शिंदेंना 469568 मते मिळाली आहेत.

udayanraje bhosale thanked satara citizens for supporting him lok sabha election result
शाहू महाराज छत्रपतींना मोठी आघाडी, तरीही संजय मंडलिक विजयावर ठाम (पाहा व्हिडिओ)

उदयनराजेंनी मतांची आघाडी घेताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लाेष केला. सातारा शहर व परिसरात फटाके फाेडले. अनेकांनी गुलाल उधाळला. दरम्यान जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे भाेसले यांचे कार्यकर्त्यांनी अभिनंदन करण्यास प्रारंभ केला.

यावेळी उदयनराजेंना अश्रु अनावर झाले. उदयनराजे यांच्या पत्नी दमयंतीराजे यांनी त्यांना मिठी मारुन अभिनंदन करत सावरले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लाेष केला.

Edited By : Siddharth Latkar

udayanraje bhosale thanked satara citizens for supporting him lok sabha election result
Shivendraraje Bhosale : मराठ्यांचा आवाज कधीही दडपला जाणार नाही, हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे : शिवेंद्रसिंहराजे भाेसले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com