Udaynraje Bhosale Trails: उदयनराजेंच्या विराेधात शशिकांत शिंदेंनी आघाडी घेताच ल्हासुर्णेत जल्लाेष, वाईत विजयाचे पाेस्टर झळकले (पाहा व्हिडिओ)

Satara Lok Sabha Election Result 2024 : सातारा लाेकसभा मतदारसंघाच्या मतमाेजणीस आज सकाळी 8 वाजता प्रारंभ झाला. एकेक फेरी निहाय निकाल बाहेर समजताच खासदार उदयनराजे भाेसले यांच्या गाेटात शांतता दिसून आली.
shashikant shinde leads in satara constituency against udayanraje bhosale lok sabha election result 2024
shashikant shinde leads in satara constituency against udayanraje bhosale lok sabha election result 2024Saam Digital

सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले यांच्या विराेधात राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी पाचव्या फेरी अखेर 21 हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्यांच्या मतांची आघाडी वाढतच असून आमदार शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी कोरेगाव येथे जल्लाेष सुरु केला. (lok sabha nivadnuk nikal 2024)

आमदार शशिकांत शिंदे यांच्या लासु-हणे येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदाेत्सव साजरा केला. वाई येथे देखील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर लावण्यास प्रारंभ केला आहे.

shashikant shinde leads in satara constituency against udayanraje bhosale lok sabha election result 2024
Raver Constituency : रक्षा खडसेंची मोठी आघाडी, मविआने मतमोजणी थांबवली, नेमका काय झाला गाेंधळ? (पाहा व्हिडिओ)

आमदार शशिकांत शिंदे यांनी हजाराे मतांची आघाडी घेताच त्यांच्या निवासस्थानी समर्थकांनी फटाके वाजवले. काहींनी गुलाल उधळला. दरम्यान दहाव्या फेरी अखेर शशिकांत शिंदे 5156 मतांनी आघाडीवर आहे. शशिकांत शिंदेंच्या आघाडीत मोठी घट झाली आहे. शशिकांत शिंदे यांना 326847 मते तर उदयनराजे भोसलेंना 321691 मते मिळाली आहेत. त्यानंतर बाराव्या फेरी अखेर शशिकांत शिंदे 795 मतांनी आघाडी घेतली.

Edited By : Siddharth Latkar

shashikant shinde leads in satara constituency against udayanraje bhosale lok sabha election result 2024
Maharashtra Election 2024: सातारा लाेकसभा मतदारसंघात पैसे वाटप झाल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com