Raver Lok Sabha News: रक्षा खडसेंची मोठी आघाडी, मविआने मतमोजणी थांबवली, नेमका काय झाला गाेंधळ? (पाहा व्हिडिओ)

Update on Raver Lok Sabha Constituency Vote Counting: रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या निर्णायक मते घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या विराेधात आघाडीवर राहिल्या आहेत.
Raver Lok Sabha Constituency News: रक्षा खडसेंची मोठी आघाडी, मविआने मतमोजणी थांबवली, नेमका काय झाला गाेंधळ? (पाहा व्हिडिओ)
Shriram Patil Complaints Over EVM Voting Machine FunctioningSaam Digital

ईव्हीएम मशीन बाबत आक्षेप घेत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रतिनिधींनी रावेर लोकसभा मतदारसंघातील मतमाेजणी थांबवली आहे. हा रडीचा डाव असून आम्ही याबाबत तक्रार केली आहे असे कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बाेलताना नमूद केले. (lok sabha nivadnuk nikal 2024)

रावेर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या फेरीत भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना 99 हजार 555 मते तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट उमेदवार श्रीराम पाटील यांना 73 हजार 223 मते मिळाली. या ठिकाणी 26 हजार 332 मतांनी रक्षा खडसे आघाडीवर राहिल्या.

Raver Lok Sabha Constituency News: रक्षा खडसेंची मोठी आघाडी, मविआने मतमोजणी थांबवली, नेमका काय झाला गाेंधळ? (पाहा व्हिडिओ)
शाहू महाराज छत्रपतींना मोठी आघाडी, तरीही संजय मंडलिक विजयावर ठाम (पाहा व्हिडिओ)

दरम्यान श्रीराम पाटील यांच्या प्रतिनिधींनी रावेर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी थांबवली. ईव्हीएम मशीनची बॅटरी 99 टक्के चार्जिंग असल्याचा आक्षेप घेतला. मतदान झाले होते तर चार्जिंग का संपली नाही असा आक्षेप पाटील यांच्या प्रतिनिधीने घेतला आहे.

विरोधकांचा रडीचा डाव सुरू आहे -एकनाथराव खडसे

रावेर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आलेले आहे रक्षा खडसे यांना 6 व्या फेऱ्या अखेर 74000 मताधिक्य मिळत आहे. खडसेंचे कार्यकर्ते खूष आहेत. यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. ते काही आरोप करत सुटलेत. भारताचे चित्र दिसत आहे म्हणून हा रडीचा डाव विरोधक खेळत आहेत अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

Raver Lok Sabha Constituency News: रक्षा खडसेंची मोठी आघाडी, मविआने मतमोजणी थांबवली, नेमका काय झाला गाेंधळ? (पाहा व्हिडिओ)
काँग्रेस कार्यकर्त्यांचा महाराष्ट्रात जल्लाेष, निकालाचा कल समजताच विजयी मिरवणुकीसाठी लागले कामाला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com