Konkan Politics: किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गट भाजपमध्ये रंगला कलगीतुरा; अखेर उदय सामंतांनी सांगितला ठावठिकाणा

Ratnagiri Sindhudurg Constituency : शिवसेना नेते उद्याेग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल झाल्याच्या प्रकरणावरून ठाकरे गट आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे.
vaibhav naik demands police security to kiran samant ratnagiri sindhudurg constituency
vaibhav naik demands police security to kiran samant ratnagiri sindhudurg constituencysaam tv

- विनायक वंजारे / अमाेल कलये

शिवसेना नेते किरण सामंत यांचा आज (मंगळवार) सकाळपासून रत्नागिरी सिंधुदूर्ग लाेकसभा मतदारसंघात संपर्क हाेऊ शकला नाही. त्यांचा फाेन संपर्क क्षेत्राबाहेर लागत आहे. त्यामुळे सेना कार्यकर्त्यांमध्ये कुरबुर सुरु हाेती. दरम्यान या प्रकाराबाबत आता ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी किरण सामंत यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी माध्यमांतून केली आहे तर उदयाेग मंत्री उदय सामंत यांनी बंधू किरण सामंत हे लांजा येथील दुर्गम भागात असल्याने त्यांच्याशी संपर्क हाेऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सेना नेते किरण सामंत नॉट रिचेबल झाल्याच्या प्रकरणावरून ठाकरे गट आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. किरण सामंत यांना तातडीने पोलिस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. (Maharashtra News)

भाजपनेही या प्रकरणात उडी घेतली असून शिवसेना आणि भाजपमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी किरण सामंत नॉट रिचेबल आहेत अशी हवा केली जात असल्याचा आरोप भाजपकडून केला गेला. किरण सामंत मतदारसंघात फिरत असून राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा दावा देखील भाजपने केला.

vaibhav naik demands police security to kiran samant ratnagiri sindhudurg constituency
Kolhapur: हिरण्यकेशी नदीत बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

दरम्यान किरण सामंत यांच्या नाॅटरिचेबल वर खूद्द त्यांचे बंधू उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेत किरण सामंत हे ग्रामीण भागामध्ये आहेत. कोकणातील काही भागात रेंज नसते. त्यामुळे त्यांचा फोन लागत नाही. आम्ही सर्व ठिकाणी आढावा घेत आहाेत. सध्या किरण सामंत हे लांजा मधील दुर्गम भागात असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

vaibhav naik demands police security to kiran samant ratnagiri sindhudurg constituency
Maharashtra Election 2024: सातारा लाेकसभा मतदारसंघात पैसे वाटप झाल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com