APMC Market Vashi: 'एपीएमसी'च्या पदपथावर बदामांचं पॅकिंग, प्रशासनाची डाेळेझाक? Video Viral

illegal almond factory at vashi apmc market navi mumbai: एपीएमसी मार्केटमध्ये आणि त्याच्या बाहेर बदाम फाेडण्याचे कारखाने काेणाच्या मर्जीने सुरु आहेत याचा शाेध घेणे आवश्यक बनले आहे.
illegal almond factory at vashi apmc market navi mumbai
illegal almond factory at vashi apmc market navi mumbaiSaam Digital

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई येथील एपीएमसी मसाला मार्केटमध्ये ड्रायफ्रूटचा राजा समजल्या जाणाऱ्या बदामाला फोडण्याचा कारखाना उभारला गेला. हा कारखाना अनाधिकृत असून पदपथावरच बदाम फाेडण्याचा प्रकार सुरु असल्याचा एक व्हिडिओ देखील समाज माध्यमातून व्हायरल हाेऊ लागला आहे. अस्वच्छ ठिकाणी बदाम फाेडण्याच्या प्रकारामुळे नागरिकांच्या आराेग्याला धाेका पाेहचू शकताे याचे भान एपीएमसी प्रशासनाने ठेवणे आवश्यक बनले आहे.

एपीएमसीच्या संचालकांच्या आशीर्वादाने बदामची प्रोसेसिंग युनिट उभारण्यात आले आहे की काय असा प्रश्न उपस्थितीत हाेऊ लागला आहे. यासोबतच गाळ्या बाहेरील पदपथाच्या बाहेर बदामाचे पॅकेजिंग करण्यात येत आहे.

illegal almond factory at vashi apmc market navi mumbai
कांदा खरेदी धोरणावर शेतकरी- व्यापा-यांत संताप, 'ढाेका'लाही विरोध

त्यामुळे अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या या प्रोसेसिंग युनिटवर एपीएमसी प्रशासन कारवाई करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान या गाेष्टीवर अन्न व औषध प्रशासन विभाग देखील लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

illegal almond factory at vashi apmc market navi mumbai
पर्यटकांनाे! आंबोली घाटात धबधबा पाहण्यासाठी जाणार आहात? वाचा नवा नियम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com