Kolhapur Bus Accident: शैक्षणिक सहलीच्या बसला अपघात, मुलींचा आक्राेश; कर्नाटक पाेलिस धावले कोल्हापुरातील विद्यार्थ्यांच्या मदतीला

kolhapur students bus met accident near karnataka : या घटनेची माहिती समजताच काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात आणले अशी माहिती बेळगाव पोलिस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी दिली.
kolhapur students bus met accident near karnataka 16 injured
kolhapur students bus met accident near karnataka 16 injured Saam Digital

- रणजीत माजगावकर

राणी चन्नम्मा मिनी प्राणी संग्रहालयाला भेट देऊन परतीच्या मार्गावर असताना कोल्हापुरातील विद्यार्थ्यांच्या बसला राष्ट्रीय महामार्ग 4 वरील भुतरामनहट्टीजवळ अपघात झाला. प्राथमिक माहितीनूसार यू-टर्न घेत असताना ट्रकची बसला धडक बसली. या घटनेत सुमारे 40 विद्यार्थी जखमी झाले. त्यापैकी 16 जणांना दुखापत झाली हाेती. सर्व जखमींवर बेळगावी बीम्स रुग्णालयात उपचार करण्यात आले.

कोल्हापूर येथील एका शेतकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल कर्नाटकात गेली हाेती. या विद्यार्थ्यांनी धारवाडच्या कृषी विद्यापीठाला भेट दिल्यानंतर ते राणी चन्नम्मा मिनी प्राणी संग्रहालयाकडे गेले.

kolhapur students bus met accident near karnataka 16 injured
Vidhan Sabha Election: राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गट विधानसभेच्या सर्वाधिक जागा लढवणार? संख्येबाबत जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं (पाहा व्हिडिओ)

तेथून परतीच्या मार्गावर असताना ट्रकची बसला मागून धडक बसली. ही धडक इतकी जाेरदार हाेती की बसमधील 40 विद्यार्थी जखमी झाले. त्यातील 16 जणांना दुखापत झाली. त्यानंतर तातडीने रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. काकती पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सर्व विद्यार्थी सुखरुप असून जखमींची प्रकृती स्थिर आहे.

Edited By : Siddharth Latkar

kolhapur students bus met accident near karnataka 16 injured
Nagpur Goa Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गाला सांगलीकरांचा विराेध, अधिसूचनेची केली होळी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com