Nagpur Goa Shaktipeeth Expressway: शेतक-यांना चौपट मोबदला द्या, अन्यथा भूसंपादन करू देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

raju shetti opposes ratnagiri nagpur highway: प्रशासनाकडून जबरदस्ती पोलिस बळाचा वापर करून मोजणीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचेकडून कार्यवाही करण्यात येत आहे असा आराेप राजू शेट्टींनी केला.
raju shetti opposes ratnagiri nagpur highway
raju shetti opposes ratnagiri nagpur highwaySaam Tv

- रणजीत माजगावकर

रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते अंकली या महामार्गातील शेतक-यांना चौपट मोबदला मिळाल्याशिवाय भुसंपादन करू देणार नाही, याबाबतीत शासनाने आपली भुमिका स्पष्ट करावी मगच मोजणीबाबत कार्यवाही करावी अशी ठाम भुमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत राजू शेट्टी यांनी आपली भूमिका मांडली.

शेट्टी म्हणाले विकास कामांना शेतक-यांचा विरोध नाही मात्र शेतक-यांची थडगी बांधून विकास करता येणार नाही. प्रशासन व सरकार दोघेही वेळकाढूपणा करू लागल्याने हा प्रकल्प रखडू लागला आहे. महाविकास आघाडी सरकारने भुसंपादन कायदा बदलला यामुळे शेतक-यांच्यी राखरांगोळी झाली.

raju shetti opposes ratnagiri nagpur highway
Dehu : देहूत जगातील सर्वात मोठी पायऱ्यांची विहीर, बांधकामास प्रारंभ

राजू शेट्टी पुढं बाेलताना म्हणाले शेतकरी वारवांर चौपट मोबदल्यासाठी हेलपाटे मारूनही याबाबत शासनाकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. प्रशासनाकडून जबरदस्ती पोलिस बळाचा वापर करून मोजणीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचेकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

raju shetti opposes ratnagiri nagpur highway
Saam Tv च्या बातमीची राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून दखल, अल्पवयीन मुलांना बेदम मारहाणप्रकरणी पोल्ट्री चालक अटकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com