Hatkanangale Election Result: हातकणंगलेत का झाला पराभव? राजू शेट्टींनी स्वत:च सांगितले (पाहा व्हिडिओ)

Raju Shetti on His Defeat in Hatkanangale: हातकणंगले लाेकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांची लढत धैर्यशिल माने, सत्यजीत पाटील-सरुडकर यांच्याशी हाेती. या मतदारसंघात राजू शेट्टींची जबरदस्त पिछेहाट झाली.
Hatkanangale Election Result: हातकणंगलेत का झाला पराभव? राजू शेट्टींनी स्वत:च सांगितले (पाहा व्हिडिओ)
Raju Shetti's Reaction After Losing in Hatkanangale Lok Sabha Constituency Saam Digital

- रणजीत माजगावकर

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मला लोकसभेत जायचं होतं पण शेतकऱ्यांनी देखील मला म्हणावी तशी साथ दिली नाही असं दिसतंय अशी भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसमारे व्यक्त केली. हातकणंगले लाेकसभा मतदारसंघात शेट्टी यांचा पराभव झाल्यानंतर ते शेतक-यांसाठी कार्यरत राहिल्याचे दिसून आले.

हातकणंगले लाेकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशिल माने यांचा माेठा मताधिक्यानी विजय झाला. या मतदारसंघात राजू शेट्टी यांना 1 लाख 79 हजार 850 मते मिळाली. त्यांना मिळालेली मते ही खूप कमी असल्याने शेट्टींना त्यांचा पराभव जिव्हारी लागला आहे.

Hatkanangale Election Result: हातकणंगलेत का झाला पराभव? राजू शेट्टींनी स्वत:च सांगितले (पाहा व्हिडिओ)
जयसिंहंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा हिशोबच बाहेर काढला, भाजपचे मानले आभार; रणजितसिंह मोहिते पाटलांना नेमका काय दिला सल्ला

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मला लोकसभेत जायचं होतं पण शेतकऱ्यानी देखील मला म्हणावी तशी साथ दिली नाही अशी खंत राजू शेट्टी यांनी बाेलून दाखवली. धार्मिक ध्रुवीकरण आणि पंतप्रधान पदाचा मुद्दा या विचारधारेमध्ये अनेक माणसं बळी पडली. त्यामुळे असा निकाल आल्याचे राजू शेट्टींनी नमूद केले.

Edited by : Siddharth Latkar

Hatkanangale Election Result: हातकणंगलेत का झाला पराभव? राजू शेट्टींनी स्वत:च सांगितले (पाहा व्हिडिओ)
विशाल पाटील महाविकास आघाडी साेबत जाणार, विश्वजीत कदमांनी दिला शब्द

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com