विशाल पाटील महाविकास आघाडी साेबत जाणार, विश्वजीत कदमांनी दिला शब्द

सत्ता बळकवण्यासाठी आणि हिसकून घेण्यासाठी महाराष्ट्रात जे केलं ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि इतिहासाला शोभणारे नव्हतं. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नव्हतं तसं या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले असे विश्वजीत कदम यांनी नमूद केले.
vishwajeet kadam assures mp vishal patil will join maha vikas aghadi
vishwajeet kadam assures mp vishal patil will join maha vikas aghadi Saam Digital

सांगलीच्या जनतेने ठरवून दाखवले की इथे विश्वजीत कदम काय करू शकतो असा जणू इशाराच काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयानंतर विरोधकांना दिला. दरम्यान विशाल पाटील हे काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे खासदार असतील असा विश्वास देखील विश्वजीत कदम यांनी माध्यमांशी बाेलताना व्यक्त केला.

लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विमान आणि पायलट याची चर्चा जोरदार रंगली होती. विशाल पाटील यांनी विश्वजीत कदम यांना आपलं पायलट आहेत ते कुठे घेऊन जातील तिकडे माझं विमान उतरेल असे म्हटले होते. याच्यावरूनच राजकारण तापले होते. तर दुसरीकडे विश्वजीत कदम यांनी विशाल पाटील यांना तिकीट मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. तर वाघाची डरकाळी सुद्धा सांगलीच्या उमेदवारीवरून फोडण्यात आली होती.

vishwajeet kadam assures mp vishal patil will join maha vikas aghadi
धुळे : खाेळंबलेल्या मतमाेजणीनंतर सुभाष भामरे गेेले पिछाडीवर, शोभा बच्छावांची निर्णायक आघाडी; जाणून घ्या नाटयमय घडामाेडी

मंगळवारी निकाला दिवशी विशाल पाटील यांनी माेठं मताधिक्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला जात हाेता. काँग्रेस कमिटीवर विमानाचा पोस्टर लावत जल्लोष सुरु झाला आणि दुसरीकडे विश्वजीत कदम हेलिकॉप्टरने सांगलीत आले. ते पाेहचताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी विश्वजीत कदम यांना खांद्यावरती घेत विशाल पाटलांच्या विजयाच्या घाेषणा दिल्या.

vishwajeet kadam assures mp vishal patil will join maha vikas aghadi
जरांगे पाटलांची खासदार बजरंग सोनवणेंनी रात्रीत घेतली भेट,दिला महत्वपूर्ण शब्द (पाहा व्हिडिओ)

विश्वजीत कदम यांनी माध्यमांशी संवाद साधताना नाईलाजाने आपल्याला ही भूमिका घ्यावी लागली असे स्पष्ट केले. ते म्हणाले विशाल पाटलांचा विजय हा सांगलीकर जनतेचा आणि काँग्रेस प्रेमी कार्यकर्त्याचा विजय आहे.

Edited By : Siddharth Latkar

vishwajeet kadam assures mp vishal patil will join maha vikas aghadi
पाण्याचे दुर्भिक्ष! उपक्रमशील शेतीतून मिळविले भरघोस उत्पन्न; वाचा नांदेड, परभणीच्या शेतक-यांची Success Story

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com