dhule lok sabha election result 2024 counting of voting stopped
dhule lok sabha election result 2024 counting of voting stopped Saam Digital

धुळे : खाेळंबलेल्या मतमाेजणीनंतर सुभाष भामरे गेेले पिछाडीवर, शोभा बच्छावांची निर्णायक आघाडी; जाणून घ्या नाटयमय घडामाेडी

dhule lok sabha election result 2024 : दरम्यान मतमोजणी केंद्रावर भाजपचे उमेदवार सुभाष भामरे, काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्यासह काँग्रेसचे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील उपस्थित आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात पाच ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला असल्याने मतमोजणी खोळंबल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमवेत दोघाही उमेदवारांची चर्चा सुरू आहे. त्यानंतर काही वेळातच मतमाेजणी सुरु झाली आणि भाजपचे उमेदवार भामरे हे पिछाडीवर गेले तर काॅंग्रेसच्या बच्छाव यांनी आघाडी घेतली. (lok sabha nivadnuk nikal)

धुळे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी अंतिम टप्प्यात आली आहे. येथे भाजपचे उमेदवार सुभाष भामरे हे 3 हजारांच्या मतांनी काॅंग्रेसच्या शाेभा बच्छाव यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. ते विजयाच्या उंबरठा्यावर असल्याचे चित्र आहे. परंतु टपाली मतमोजणी होणं बाकी असून कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा या संदर्भात झाली नाही.

dhule lok sabha election result 2024 counting of voting stopped
उदयनराजेंना अश्रू अनावर, पत्नी दमयंतीराजेंनी सावरलं; नेमकं काय घडलं जलमंदिर पॅलेसमध्ये? VIDEO

या अटीतटीच्या शर्यतीमध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातील पाच ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला असल्याने मतमोजणी खोळंबली आहे. विजयाचे अंतर कमी असल्याने दोघेही उमेदवार मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहेत. येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह दोघाही उमेदवारांची चर्चा सुरू आहे. विजयाचा आकडा जास्त नसल्यामुळे फेर मतमोजणीची मागणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शोभा बच्छाव विजयाच्या उंबरठ्यावर

दरम्यान खोळंबलेली मतमोजणी प्रक्रिया पुन्हा झाली. धुळे लोकसभा काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव यांना पाच लाख 79 हजार 172 मते मिळाली आहेत तर सुभाष भामरे यांना पाच लाख 71 हजार 381 मते मिळालीत. अठराव्या फेरी अखेर काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव 7791 मतांनी आघाडीवर आहे. काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव या विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे. अद्याप अंतिम फेरी बाकी आहे.

Edited By : Siddharth Latkar

dhule lok sabha election result 2024 counting of voting stopped
छत्रपती घराण्यावरील प्रेम जनतेने दाखवून दिले, माेठं मताधिक्यानंतर राजेंची पहिली प्रतिक्रिया (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com