छत्रपती घराण्यावरील प्रेम जनतेने दाखवून दिले, माेठं मताधिक्यानंतर राजेंची पहिली प्रतिक्रिया (पाहा व्हिडिओ)

yuvraj sambhajiraje chhatrapati thanked citizens of kolhapur : काेल्हापूर लाेकसभा मतदारसंघात काॅंग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आणि भाजप खासदार संजय मंडिलक यांच्यातील लढतीत शाहू महाराज यांनी निर्णायक मताधिक्य घेतले आहे.
yuvraj sambhajiraje chhatrapati thanked citizens of kolhapur for supporting shahu maharaj
yuvraj sambhajiraje chhatrapati thanked citizens of kolhapur for supporting shahu maharaj Saam Digital

- रणजीत माजगावकर

छत्रपती घराण्यावर काेल्हापूरच्या जनतेने दाखविलेल्या विश्वासामुळे काेल्हापूर लाेकसभा मतदारसंघात शाहू महाराज छत्रपती यांचा माेठ्या मताधिक्याने विजय हाेत आहे. त्याचा आम्हांला खूप आनंद हाेत आहे अशी भावना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी बाेलताना व्यक्त केला. (lok sabha nivadnuk nikal 2024)

काेल्हापूर लाेकसभा मतदारसंघात काॅंग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आणि भाजप खासदार संजय मंडिलक यांच्यातील लढतीत शाहू महाराज यांनी निर्णायक मताधिक्य घेतल्यानंतर महाविकास आघाडीने जल्लोष केला. शाहू महाराज छत्रपती यांना शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापूरकर न्यू पॅलेस येथे दाखल झाले. शाहू महाराज छत्रपती यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील जल्लोष सुरु आहे.

yuvraj sambhajiraje chhatrapati thanked citizens of kolhapur for supporting shahu maharaj
Udaynraje Bhosale Trails: उदयनराजेंच्या विराेधात शशिकांत शिंदेंनी आघाडी घेताच ल्हासुर्णेत जल्लाेष, वाईत विजयाचे पाेस्टर झळकले (पाहा व्हिडिओ)

खासदार संभाजीराजे छत्रपती हे देखील जल्लाेषात सहभागी झाले. ते म्हणाले शाहू महाराज छत्रपती यांचा विजय निश्चित हाेता. काेल्हापूरच्या जनतेने दाखवून दिले आमचं किती प्रेम विश्वास छत्रपती घराण्यावर आहे. 50 हजार मतांनी आत्ताच सातव्या फेरीत आघाडी घेतली त्याचा सर्वजण आनंद व्यक्त करीत आहेत. थाेड्याच वेळात सर्वत्र जल्लाेष सुरु हाेईल असेही राजेंनी म्हटलं.

Edited By : Siddharth Latkar

yuvraj sambhajiraje chhatrapati thanked citizens of kolhapur for supporting shahu maharaj
Raver Lok Sabha News: रक्षा खडसेंची मोठी आघाडी, मविआने मतमोजणी थांबवली, नेमका काय झाला गाेंधळ? (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com