Sangli Dcc Bank: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतून अधिकारी, कर्मचारी गायब? रघूनाथदादा पाटलांनी दिली 2 दिवसांची मुदत

rajhunathdada patil demands inquiry of sangli dcc bank employees : बॅंक कर्मचारी आणि अधिकारी हे कामानिमित्त बाहेर गेल्याची माहिती सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून रघूनाथदादा पाटील यांना देण्यात आली.
rajhunathdada patil demands inquiry of sangli dcc bank employees
rajhunathdada patil demands inquiry of sangli dcc bank employees Saam Digital

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई करावी. येत्या दोन दिवसांत कारवाई न झाल्यास शेतक-यांसह बँकेत आम्ही धडक देऊ असा इशाराही शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला. दरम्यान ऱघुनाथदादा पाटील हे बॅंकेत येणार असल्याचे समजताच अधिका-यांनी बॅंकेतून पळ काढल्याची चर्चा सांगलीत रंगली हाेती.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत नुकताच सहा शाखांमध्ये 2 कोटी 43 लाखांचा दुष्काळ आणि अवकाळी निधीवर डल्ला मारण्याचा प्रकार शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांकडून झाल्याचे समोर आले आहे. या घोटाळाप्रकरणी बँकेने सात जणांना निलंबित केले आहे.

rajhunathdada patil demands inquiry of sangli dcc bank employees
Dajipur Sanctuary: राधानगरी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये 13 वर्षाच्या मुलीसह तिघांचा मृत्यू

आज शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील हे सांगली जिल्हा बँकेत घाेटाळा प्रकरणाची विचारपूस करण्यासाठी येणार असल्याची चर्चा हाेती. ही चर्चा जिल्हा बँकेतील कर्मचारी, अधिकारी यांच्यापर्यंत पाेहचली.

पाटील बॅंकेत गेल्यावर कर्मचारी आणि अधिकारी जागेवर नव्हते अशी चर्चा आहे. दरम्यान बँकेच्या अधिकाऱ्यांवर ठोस अशी कारवाई दोन दिवसांत झालीच पाहिजे, अन्यथा पुन्हा बँकेत आम्ही धडक देऊ असा इशाराही रघुनाथदादा यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

rajhunathdada patil demands inquiry of sangli dcc bank employees
Sindhudurg: कामचुकारपणा करण्यापेक्षा समस्या सोडवा, आमदार वैभव नाईकांचे अधिका-यांना खडेबाेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com