काेल्हापुरात शेतक-यांचा माेर्चा, तुघलकी निर्णय मागे घ्या अन्यथा 6 जूननंतर आंदाेलनाची तीव्रता वाढविणार; सरकारला इशारा

Maharashtra Irrigation Federation Rasta Roko Andolan In kolhapur : दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात हाेता.
maharashtra irrigation federation rasta roko andolan near panchganga river
maharashtra irrigation federation rasta roko andolan near panchganga riverSaam Digital
Published On

- रणजीत माजगावकर

कृषी पंपांना जलमीटर बसवण्याची सक्ती रद्द करा, वाढीव पाणीपट्टी मागे घ्या, वाढीव रक्कम शेतकऱ्यांच्या सातबारावर नोंदणी करण्याची प्रक्रिया थांबवा यासह अन्य मागण्यासाठी आज (बुधवार) महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनच्या वतीने एल्गार पुकारण्यात आला. यावेळी आंदाेलकांनी पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग लगत पंचगंगा पुला नाजिक असणाऱ्या सेवा रस्त्यावर ठिय्या आंदोलन छेडण्यात आले.

महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, डॉ. भारत पाटणकर, संजयबाबा घाटगे यांच्या नेतृत्वाखाली हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते.

maharashtra irrigation federation rasta roko andolan near panchganga river
पंढरीतून आली आनंदाची बातमी, भीमा नदीवरील सर्वात मोठ्या पुलाचे काम पूर्ण; जाणून घ्या कधीपासून हाेणार वाहतूकीसाठी खुला

यापूर्वीही पंपधारकांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांची बैठक झाली. मात्र यावर ठोस निर्णय झालेला नाही म्हणून सरकारच्या विरोधात पहिला टप्प्यातले हे आंदोलन करण्यात आल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले.

आचारसंहितेचे कारण देत सरकारने 6 जूनपर्यंतची वेळ महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनला दिली आहे. जर या वेळेत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला सरकारला दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

maharashtra irrigation federation rasta roko andolan near panchganga river
Sambhajinagar Crime: लाचेच्या रक्कमेसह पाेलिसांनी ठाेकली धूम, गंगापूर ठाण्यात गु्न्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com