MNS Andolan : पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर, मनसैनिकांचा प्रदुषण महामंडळास इशारा; मृत माशांचे केले उत्तरकार्य

Panchganga River Pollution : कोल्हापूरच्या पंचगंगा नदीतील मृत माशांचे पाप इचलकरंजीकरांना लागू नये म्हणून मनसेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले.
mns protest against pollution control board at panchganga river ichalkaranji
mns protest against pollution control board at panchganga river ichalkaranji Saam Digital

- रणजीत माजगावकर

पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पंचगंगा नदीत प्रदूषित पाणी आल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडले. दरम्यान पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी ठाेस उपाययाेजना कराव्यात अन्यथा 100 किलो फुलांचा हार अधिकाऱ्यांना घालून सत्कार करु असा इशारा मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदुषण महामंडळास दिला आहे. (Maharashtra News)

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीतील मृत माशांचे पाप इचलकरंजीकरांना लागू नये म्हणून मनसेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. इचलकरंजी इथं पंचगंगा नदी घाटावर मनसैनिकांनी माशांचे पिंडदान केलं.

mns protest against pollution control board at panchganga river ichalkaranji
अकोला : प्रसिद्ध व्यावसायिकाचे 1 कोटीच्या खंडणीसाठी अपहरण, मुख्य सूत्रधारासह पाच जणांना अटक

पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रशासनाला जागे करण्यासाठी हे अनोखे आंदोलन मनसेनं केले. पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न न करता अधिकारी कागदी घोडे नाचवत आहेत. त्यामुळे जर पुढच्या काही दिवसात पंचगंगा प्रदूषण मुक्त नाही झाली तर 100 किलो फुलांचा हार अधिकाऱ्यांना घालून सत्कार करणार असल्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

mns protest against pollution control board at panchganga river ichalkaranji
Ranjitsinh Naik Nimbalkar : कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लावाल तर मुळावर घाव घालू; रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा मोहिते पाटलांना इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com