akola police arrests five in arunkumar vora case
akola police arrests five in arunkumar vora caseSaam Digital

अकोला : प्रसिद्ध व्यावसायिकाचे 1 कोटीच्या खंडणीसाठी अपहरण, मुख्य सूत्रधारासह पाच जणांना अटक

arunkumar vora case : मिथुन उर्फ़ मॉन्टी हा यातील मुख्य सूत्रधार असून तो अपंग आहे. त्याने फिरोज खान याच्या मदतीनं सर्व प्रकार केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

- अक्षय गवळी

अकाेला येथील 'काच बॉटल सप्लायर' प्रसिद्ध व्यावसायिक 'अरुणकुमार वोरा' यांच्या अपहरण प्रकरणी अकाेला पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये मिथुन उर्फ मॉन्टी इंगळे हा प्रमुख सूत्रधार असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. संशयितांकडून गुह्यात वापरण्यात आलेली कार, 2 बनावट देशी कट्टे तसेच 4 मोबाईल फोन असा 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमा जप्त करण्यात आला आहे. एक काेटी रुपयांच्या खंडणीसाठी वाेरा यांचे संशयितांनी अपहरण केल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनोज बहुरे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिले. (Maharashtra News)

अकोला येथील रामदास पेठ पोलिस ठाणे हद्दीतील चारजिन कापाउंड परिसरात सोमवारी रात्री वाेरा यांचे अपहरण झाले हाेते. दगडीपुल भागात वोरा याचं 'रिकाम्या काच बॉटल'चं गोदाम आहे. ते गोदाम बंद करून ते बाहेर पड़त असतानाच पांढ़ऱ्या रंगाची चारचाकी वाहन त्यांच्याजवळ आली. 2 ते 3 जणांनी वाहनातून खाली उतरुन धाक दाखवत त्यांचं अपहरण केले हाेते. पाेलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला हाेता.

akola police arrests five in arunkumar vora case
नांदेडमध्ये विषबाधा; 55 भाविक नायगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल

पोलिस निरीक्षक मनोज बहुरे म्हणाले अकोला पोलिसांना अपहरणकर्त्यांचा सुगावा लागला मात्र याची माहिती त्यांच्यापर्यत पोहचली. पोलिस आपल्यापर्यत पोहचणार तितक्यात त्यांनी अरुणकुमार यांना एका रिक्षात बसवून घराकड़े रवाना केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाेलिसांनी अरुणकुमार यांची त्यांच्या निवासस्थानी चौकशी केली. चौकशी दरम्यान काहींचे नावे समोर आले. या प्रकरणी किशोर दाभाडे, फिरोज खान युसूफ खान, शरद पुंजाजी दाभाडे, आशिष अरविंद घनबाहादुर, राजा सरफराज खान, चंदु इंगळे या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वांचे माेबाईल लोकेशनं हाती लागले आणि रात्री उशिरापर्यत अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखाने 7 पैकी 5 अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले. दोघांचा शाेध सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

akola police arrests five in arunkumar vora case
Yavatmal Crime: युवकानं अंगावर पेट्राेल ओतून घेतल्याने पंचायत समिती कार्यालयात उडाला गाेंधळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com