Ranjitsinh Naik Nimbalkar : कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लावाल तर मुळावर घाव घालू; रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा मोहिते पाटलांना इशारा

आमदार राम सातपुते यांना हीन वागणूक दिली याचे त्यांना जनताच उत्तर देणार आहे. यापुढे माळशिरस तालुक्यात दहशत खपवून घेतली जाणार नाही असेही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नमूद केले.
ranjitsinh naik nimbalkar warns mohite patil faction in dhaigaon madha lok sabha election
ranjitsinh naik nimbalkar warns mohite patil faction in dhaigaon madha lok sabha electionSaam Digital

आमच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लावाल तर फांद्यांवर नव्हे मुळावर घाव घालू असा इशारा भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी विराेधकांना नुकताच दिला आहे. नाईक निंबाळकर यांचा हा इशारा थेट मोहिते पाटील यांना असल्याची चर्चा माढा लाेकसभा मतदारसंघात रंगली आहे. (Maharashtra News)

माढा लाेकसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर काही काळ राजकीय वातावरण शमले हाेते. आता पुन्हा येथील राजकीय वातावरण ढवळू लागले आहे. एकीकडे रणजितसिंह माेहिते पाटील यांनी नीरेच्या पाण्यासाठी फलटण येथे आंदाेलन छेडण्याचा इशारा दिला. दूसरीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दहिगाव येथील कार्यक्रमात मोहिते पाटलांना लक्ष्य केले.

ranjitsinh naik nimbalkar warns mohite patil faction in dhaigaon madha lok sabha election
50 हजाराची लाच घेतल्याने शिक्षणाधिका-यास अटक, जाणून घ्या प्रकरण

माळशिरस तालुक्यातील दहिगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचा नामाेल्लेख टाळत यापुढे फांद्यावर नाही तर थेट मुळावर घाव घालू अशी टिप्पणी केली. माळशिरस येथील माझ्या एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लावून बघा, नाही तुमच्या मुळावर घाव घातला तर माझे नाव निंबाळकर नाही असे त्यांनी ठणाकावून सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माळशिरसमध्ये दहशत खपवून घेतली जाणार नाही : रणजितसिंह नाईक निंबाळकर

आमदार राम सातपुते यांना हीन वागणूक दिली याचे त्यांना जनताच उत्तर देणार आहे. यापुढे माळशिरस तालुक्यात दहशत खपवून घेतली जाणार नाही. कोणी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या पेट्या बंद करून बंगल्याला कुलूप लावायला आपण पुढे असू असेही नाईक निंबाळकर यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

ranjitsinh naik nimbalkar warns mohite patil faction in dhaigaon madha lok sabha election
Mahadev App Case: महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणाचं लोण महाराष्ट्रात पोहोचलं; 70 जणांसह बडा व्यापारी पोलिसांच्या ताब्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com