Mahadev App Case: महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणाचं लोण महाराष्ट्रात पोहोचलं; 70 जणांसह बडा व्यापारी पोलिसांच्या ताब्यात

Mahadev Betting App Scam: दरम्यान नारायणगाव येथील या सेंटरमधुन पुणे जिल्ह्यात अजुन अशा पद्धतीने सेंटर चालवली जातात का याबाबत पाेलिस तपास करीत आहेत.
Police Raids Building In Narayangaon And Arrest Suspects in Mahadev App Betting Case
Police Raids Building In Narayangaon And Arrest Suspects in Mahadev App Betting CaseSaam Digital

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नारायणगाव येथे छापेमारी केली. पाेलिसांनी नारायणगाव येथील एका बड्या व्यापा-यासह कुटुंबातील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चाैकशी सुरु असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

Police Raids Building In Narayangaon And Arrest Suspects in Mahadev App Betting Case
IT Raid in Akola : अकाेल्यात आंगडिया कार्यालयावर 'आयकर'ची धाड; नांदेडच्या 'त्या' कारवाईचे धागेदोरे?

परदेशासह देशातील इतर राज्यातल्या छापेमारी नंतर महादेव ऑनलाइन बेटिंग ॲपची पायामुळं पुण्याच्या नारायणगाव मध्ये सुरु हाेती. नारायणगाव शहरातील एका इमारतीत हे काम सुरु हाेते. (mahadev betting app marathi news)

संपुर्ण इमारत महादेव अँपसाठी वापरत असल्याची माहिती समाेर आली आहे. पाेलिसांनी येथे कार्यरत असणा-या सुमारे 70 ते 80 जणांना ताब्यात घेतले आहे. नारायणगाव पोलिस ठाणे येथे संशयितांची चाैकशी सुरु आहे.

या तपाससाठी नारायणगाव येथील एका बड्या व्यापा-यासह कुटुंबातील दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान नारायणगाव येथील या सेंटरमधुन पुणे जिल्ह्यात अजुन अशा पद्धतीने सेंटर चालवली जातात का याबाबत पाेलिस तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Police Raids Building In Narayangaon And Arrest Suspects in Mahadev App Betting Case
Kolhapur: काेल्हापूर जिल्ह्यात गव्यांची दहशत पुन्हा वाढली, राधानगरीसह आज-यात कारला धडक; दाेघे गंभीर जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com