50 हजाराची लाच घेतल्याने शिक्षणाधिका-यास अटक, जाणून घ्या प्रकरण

Nandurbar Education Officer Held For Taking Bribe : शिक्षणाधिकारी यांच्या विराेधात तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचत कारवाई केली.
education officer held for taking bribe worth rs 50 thousand in  nandurbar
education officer held for taking bribe worth rs 50 thousand in nandurbarSaam Digital

- सागर निकवाडे

नंदुरबार जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांना नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 50 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी करण्यात आली असून चाैधरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

या कारवाई बाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी : चाैधरी याने नवापूर शहरातील एका बंद असल्याचे शाळेचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक विद्यालयाची आरटीई मान्यता वर्धित करण्याचे काम करुन दिले. त्या बदल्यात बक्षीस म्हणून 50 हजाराची लाच मागितली.

education officer held for taking bribe worth rs 50 thousand in  nandurbar
Nashik: आता चोरट्यांची नजर कांद्यावर, नाशकात लाखभर रुपयांचा कांदा गेला चोरीस

तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने सापळा रचत सतीश चौधरी याला 50 हजार रुपयांची लाच घेताना पकडले. त्याच्या विरोधात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

education officer held for taking bribe worth rs 50 thousand in  nandurbar
Yavatmal Crime: युवकानं अंगावर पेट्राेल ओतून घेतल्याने पंचायत समिती कार्यालयात उडाला गाेंधळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com