Nashik: आता चोरट्यांची नजर कांद्यावर, नाशकात लाखभर रुपयांचा कांदा गेला चोरीस

Onion : कांदा विक्रीसाठी कोर यांनी काही कांदा ट्रॉली मध्ये भरुन ठेवला होता. पावसाचे वातावरण असल्याने ते कांदा झाकण्यासाठी पुन्हा शेतात आले असता कांदा चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
onions worth rs 1 lakh stolen from farmers tractor near nashik
onions worth rs 1 lakh stolen from farmers tractor near nashik Saam Digital
Published On

- अजय सोनवणे

नाशिकच्या सटाणा तालूक्यातील अंबासन परिसरात शेतात काढून ठेवलेल्या कांद्यावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. या चाेरट्यांनी सुमारे ४० ते ४५ क्विंटल कांदा चोरुन नेला आहे. प्राथमिक अंदाजानूसार या कांद्याची किंमत सुमारे 1 लाख रुपयांपर्यंत आहे. (Maharashtra News)

मालेगाव-नामपूर रस्त्यावर देवीदास कोर या शेतक-याने पाच एकर शेतात कांदा लागवड केली होती. त्यासाठी त्याला जवळपास १ लाख ३५ हजाराचा खर्च झाला होता. कांदा काढून शेतात शिरोळ्या करुन ठेवलेल्या होत्या.

onions worth rs 1 lakh stolen from farmers tractor near nashik
Olive Ridley Turtle Conservation: कोकणात कासव संवर्धन मोहिमेला तापमानवाढीचा फटका, 50 टक्के पिल्लांची संख्या घटली

कांदा विक्रीसाठी कोर यांनी काही कांदा ट्रॉली मध्ये भरुन ठेवला होता. पावसाचे वातावरण असल्याने ते कांदा झाकण्यासाठी पुन्हा शेतात आले असता कांदा चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी जायखेडा पोलिसांत कांदा चोरीची तक्रार काेर यांनी दिली. पाेलिस तपास करीत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

onions worth rs 1 lakh stolen from farmers tractor near nashik
Amravati: अमरावतीत रक्ताचा तुटवडा, रक्तदात्यांना, सामाजिक संस्थांसह गणेशाेत्सव मंडळांना रक्तदानाचे आवाहन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com