Olive Ridley Turtle Conservation: कोकणात कासव संवर्धन मोहिमेला तापमानवाढीचा फटका, 50 टक्के पिल्लांची संख्या घटली

turtle conservation project ratnagiri: उष्णतेमुळे अंडी खराब झाल्यानं पन्नास टक्के पिल्लांची संख्या कमी झाली असल्याचं दिसून आलं आहे. यामुळे कासवप्रेमींत चिंता वाढली
heat wave affects olive ridley turtle conservation project ratnagiri
heat wave affects olive ridley turtle conservation project ratnagiriSaam Digital

रत्नागिरी जिल्ह्यात कासव संवर्धन मोहिमेला यावर्षी तापमान वाढीचा फटका बसत असल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. गेल्या काही वर्षांत अंडी संवर्धनाचा कार्यक्रम वनविभाग व स्थानिक कासवमित्रांच्या सहकार्याने यशस्वीपणे सुरू आहे. (Maharashtra News)

यंदा या अंडी संवर्धनाला तीव्र उन्हाळ्याचा फटका बसला असून वाढत्या उष्णतेमुळे अंडी उबवून त्यातून पिल्ले बाहेर पडण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. उष्णतेमुळे अंडी खराब झाल्यानं पन्नास टक्के पिल्लांची संख्या कमी झाली असल्याचं दिसून आलं आहे.

heat wave affects olive ridley turtle conservation project ratnagiri
Konkan: आंब्याच्या लाकडी पेट्या होणार इतिहासजमा, प्लॅस्टिकच्या कॅरेटला बागायतदारांची पसंती; जाणून घ्या कारण

रत्नागिरी व राजापूर तालुक्यातील पाच किनाऱ्यांवर २३ हजार २७ अंडी आढळून आली होती. त्यातून १० हजार ७९६ पिल्लेच बाहेर पडली आहेत. यातील अनेक अंडी वाढलेल्या उष्णतेमुळे खराब झाली असल्याचं दिसून आलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

heat wave affects olive ridley turtle conservation project ratnagiri
Lok Sabha Election 2024: आधी चंद्रपूरला आता तेलंगणात बजावणार मतदानाचा हक्क, एकाच निवडणुकीत दोनदा मतदान, ते कसं बरं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com