Amravati: अमरावतीत रक्ताचा तुटवडा, रक्तदात्यांना, सामाजिक संस्थांसह गणेशाेत्सव मंडळांना रक्तदानाचे आवाहन

Dontae Blood : उन्हामुळे रक्तदान शिबिराचे आयोजन मंदावल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांसाठी आवश्यक रक्ताची गरज लक्षात घेता नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
shortage of blood in amravati general hospital appeals citizens to donate blood
shortage of blood in amravati general hospital appeals citizens to donate blood Saam Digital

- अमर घटारे

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील खासगी रक्तपेढीमध्येही सारखीच परिस्थिती असल्याने अनेक गरजू रुग्णांना वेळेत रक्तपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान करणे गरजेचे बनले आहे. स्वयंसेवी संस्था यांना देखील रक्तदान शिबीर आयाेजित करुन रक्तसाठा करण्यास मदत करावी असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयातून करण्यात आले आहे. (Maharashtra News)

अमरावती जिल्ह्यात जवळपास २४ शासकीय तर १५० च्या जवळपास खासगी रुग्णालये आहेत. त्यामुळे येथे हजारो रुग्ण भरती हाेत असतात. बहुतांश रुग्णांना रक्ताची गरज असते. जिल्ह्यात पाच रक्तपेढी असून मध्ये ऑनलाइन माहिती नुसार केवळ 59 रक्तपिशव्या शिल्लक आहेत. त्या फक्त आज दिवसभर पुरु शकतो त्यामुळे रक्तअभावी रुग्णाची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

shortage of blood in amravati general hospital appeals citizens to donate blood
Mahadev App Case: महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणाचं लोण महाराष्ट्रात पोहोचलं; 70 जणांसह बडा व्यापारी पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान रक्ताअभावी अनेक शस्त्रक्रियाही पुढे ढकलल्या जात असल्याची माहिती समाेर येत आहे. उन्हामुळे रक्तदान शिबिराचे आयोजन मंदावल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांसाठी आवश्यक रक्ताची गरज लक्षात घेता नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

shortage of blood in amravati general hospital appeals citizens to donate blood
Parbhani Water Crisis News: चिंताजनक! हंडाभर पाण्यासाठी माेजावे लागताहेत पैसे, पेडगावकरांचा ग्रामपंचायतीवर माेर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com